IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियात अचानक या 2 खेळाडूंची एन्ट्री, कुणाला मिळाली संधी?

India Tour Of Australia 2024 : बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या दुसऱ्या अनऑफीशिल टेस्ट मॅचसाठी टीम इंडिया ए मध्ये 2 खेळाडूंना संधी दिली आहे. जाणून घ्या कोण आहेत ते?

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियात अचानक या 2 खेळाडूंची एन्ट्री, कुणाला मिळाली संधी?
team india test cricket
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Nov 06, 2024 | 9:25 PM

न्यूझीलंडने मायदेशात लोळवल्यानंतर टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाने 3-0 ने कसोटी मालिका गमावली. त्यामुळे आता टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचायचं असेल तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4-1 ने मालिका जिंकावी लागणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा दौरा आव्हानात्मक असणार आहे. त्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियात 2 खेळाडूंची अचानक एन्ट्री झाली आहे.

या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीआधी टीम इंडिया ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए यांच्यात अनऑफीशियल टेस्ट मॅचेस खेळवण्यात येत आहे. उभयसंघातील दुसरी अनऑफीशियल टेस्ट मॅच 7 नोव्हेंबरला होणार आहे. त्याआधी टीम इंडिया एमध्ये केएल राहुल आणि ध्रुव जुरेल या दोघांना जोडण्यात आलं आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. तर याआधी यश दयाल याच्या जागी प्रसीध कृष्णा याचा समावेश करण्यात आला होता. यश दयालचा दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टी 20i मालिकेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यश दयालच्या जागी प्रसिधला स्थान देण्यात आलंय.

ध्रुव जुरेल आणि केएल राहुल या दोघांची एन्ट्री

दुसऱ्या अनऑफीशियल टेस्टसाठी अपडेटेड टीम इंडिया ए : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), अभिमन्यू इसवरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, देवदत्त पडिककल, रिकी भुई, बाबा इंद्रजित, इशान किशन (विकेटकीपर), अभिषेक पोरेल (विकेटकीपर), मुकेश कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी, मानव सुथार, तनुष कोटीयन, प्रसीद कृष्णा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) आणि केएल राहुल.

ऑस्ट्रेलिया ए टीम : नॅथन मॅकस्विनी (कर्णधार), सॅम कोन्स्टास, मार्कस हॅरिस, कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट, ब्यू वेबस्टर, कूपर कॉनोली, जोश फिलिप (विकेटकीपर), फर्गस ओ नील, टॉड मर्फी, ब्रेंडन डॉगेट, जॉर्डन बकिंगहॅम, मायकेल नेसर, जिमी पीअरसन, मार्क स्टेकेटी, स्कॉट बोलँड, नॅथन मॅकअँड्र्यू, ऑलिव्हर डेव्हिस आणि कोरी रोचिचिओली.