AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kavya Maran Marriage: करोडपती काव्या मारनचं लग्न ठरलं! होणारा पती किती श्रीमंत, संपत्तीचा आकडा थक्क करणारा!

आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद संघाची सीईओ असलेल्या काव्या मारनच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. काव्या मारन आणि प्रसिद्ध संगीतकार अनिरूद्ध रविचंदर लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. हे एक हायप्रोफाईल लग्न असल्याने लक्ष वेधून घेत आहे. चला जाणून त्यांच्या लग्न आणि संपत्तीबाबत...

Kavya Maran Marriage: करोडपती काव्या मारनचं लग्न ठरलं! होणारा पती किती श्रीमंत, संपत्तीचा आकडा थक्क करणारा!
Kavya Maran Marriage: करोडपती काव्या मारनचं लग्न ठरलं! होणारा पती किती श्रीमंत, संपत्तीचा आकडा थक्क करणारा!Image Credit source: TV9 Network/Hindi
| Updated on: Aug 18, 2026 | 7:38 PM
Share

आयपीएल दरम्यान सनरायझर्स हैदराबाद संघाला कायम प्रोत्साहन देणारा सुंदर चेहरा म्हणून काव्या मारन यांच्याकडे पाहिलं जातं. सनरायझर्स हैदराबाद संघाची सीईओ काव्या मारन तिच्या सौंदर्यामुळे कायम चर्चेत राहिली आहे. आता काव्या मारन लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी समोर आली आहे. काव्या मारनचा वाढदिवस नुकताच पार पडला. 8 ऑगस्टला पार पडलेल्या वाढदिवसाच्या सोहळ्यानंतर लग्नाचं ठिकाण, इतर व्यवस्थेबाबत महत्त्वाचे निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. काव्या मारन आणि संगीतकार अनिरूद्ध रविचंदर 11 नोव्हेंबर 2026 रोजी लग्न बंधनात अडकतील असं सांगितलं जात आहे. दोन्ही कुटुंबियांनी याबाबत गोपनीयता बाळगली असली तरी, मिळालेल्या माहितीनुसार, ग्रीसमधील डेस्टिनेशन वेडिंगसाठी निवडलेल्या इव्हेंट मॅनेजमेंट टीम्सनी आंतरराष्ट्रीय प्रवासाची व्यवस्था, पाहुण्यांचे व्हिसा आणि सुरक्षेची व्यवस्था हाताळण्यास सुरुवात केली आहे.

काव्या मारनचा होणारा नवरा नेमका काय करतो?

काव्या मारन कोट्याधीश आहे याबाबत अनेकांना माहिती आहे. काव्या मारनची संपत्ती अंदाजे 400 ते 500 कोटींच्या घरात आहे. पण तिचा होणारा नवरा किती संपत्तीचा मालक आहे? याबाबत उत्सुकता आहे. आतापर्यंत त्याने काय काम केलं आहे? त्याची ओळख काय? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. त्याची सर्व उत्तरं तुम्हाला पुढे मिळतील. अनिरुद्ध रविचंदर हा दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील यशस्वी आणि लोकप्रिय संगीतकार आहे. 2011-12 मध्ये जगभर गाजलेल्या ‘Why This Kolaveri Di’ या गाण्याचे संगीत देऊन अनिरुद्धने करिअरची धमाकेदार सुरूवात केली होती. अनिरुद्धने रजनीकांत यांचा ‘जेलर’, थलपथी विजयचा ‘लिओ’ आणि शाहरुख खानचा ‘जवान’ यांसारख्या बिग बजेट चित्रपटांना संगीत दिलं. यावरून त्याच्या कामाची पोचपावती मिळते.

अनिरूद्ध रविचंदरची संपत्ती किती?

प्रसिद्ध संगीतकार आणि गायक असलेल्या अनिरुद्ध रविचंदरची अंदाजे संपत्ती 50 ते 60 कोटींच्या घरात असण्याची शक्यता आहे. त्याच्या संपत्तीबाबत अधिकृत माहिती नाही. पण मॅजिक ब्रिक्सच्या रिपोर्टनुसार, त्याची संपत्ती अंदाजे 60 कोटींच्या घरात असण्याची शक्यता आहे. अनिरूद्ध देशातील महागड्या संगीतकारांपैकी एक आहे. त्याला एका चित्रपटसाठी अंदाजे 8 ते 10 कोटी मानधन मिळतं. तर देश विदेशात होणाऱ्या संगीत कार्यक्रमातून कोट्यवधींची कमाई होते. अनेक नामांकित ब्रँड्सचा चेहरा असल्याने जाहिरातीतूनही पैसे मिळतात. अनिरुद्धने ‘VS Mani & Co’ या फिल्टर कॉफी स्टार्टअपमध्ये सह-संस्थापक आणि ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून गुंतवणूक केल्याचं बोललं जात आहे. इतकंच काय तर चेन्नईत त्याचं अलिशान घर आहे. पण काव्या मारनची संपत्ती अनिरूद्धच्या संपत्तीच्या तुलनेत दहा पटीने अधिक आहे हे देखील तितकंच खरं आहे.

Follow Us
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्.... शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल...
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल... नेमकं काय घडणार?
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?