
फिनीशर रिंकु सिंह याने रविवारी 28 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध विजयी चौकार लगावून टीम इंडियाला आशिया चॅम्पियन केलं. टीम इंडियाने पाकिस्तानला या स्पर्धेत तिसऱ्यांदा पराभूत करत नवव्यांदा आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरलं. रिंकुला या स्पर्धेतील फायनलआधी झालेल्या सहाही सामन्यात संधी मिळाली नाही. मात्र रिंकूला अंतिम फेरीत हार्दिक पंड्या याच्या जागी संधी देण्यात आली. रिंकूसाठी थेट अंतिम सामन्यात खेळणं आव्हान होतं. त्यात अखेरच्या क्षणी रिंकूला बॅटिंगला यावं लागलं. मात्र रिंकुने अशा आव्हानात्मक स्थितीतही चौकार ठोकला आणि भारताला जल्लोष करण्याची संधी दिली.
रिंकूला या सामन्यातही फक्त 1 चेंडूच खेळायला मिळाला. मात्र रिंकु आणि साऱ्या देशवासियांसाठी हा चेंडू अविस्मरणीय ठरला. रिंकूने फोर मारून भारताला विजयी केलं. रिंकूच्या फटक्यानंतर एकच जल्लोष पाहायला मिळाला. साऱ्या देशवासियांनी आनंद साजरा केला. रिंकूच्या विजयी फटक्यानंतर त्याच्या वडिलांनाही आनंद झाला. रिंकूचे वडील खानचंद यांनी भारताच्या विजयानंतर काय प्रतिक्रिया दिली? तसेच खानचंद रिंकूबाबत काय म्हणाले? जाणून घेऊयात. खानचंद यांची तब्येत बरी नव्हती. मात्र एका फटक्याने खानचंद ठणठणीत झाले. खानचंद यांनी जल्लोष केला.
“कालचा सामना चांगला होता. माझी तब्येत थोडी बिघडली होती. पठ्ठ्याने विजयी चौकार लगावताच मी पूर्णपणे बरा झालो. ही फार आनंदाची बाब आहे. मी संपूर्ण सामना पाहिला”, असं खानचंद म्हणाले. तसेच या विजयानंतर रिंकूने काय म्हटलं हे जाणून घेऊयात.
रिंकू के पापा काय म्हणाले?
#WATCH अलीगढ़, उत्तर प्रदेश: भारतीय क्रिकेटर रिंकू सिंह के पिता खानचंद सिंह ने बताया, “कल का मैच अच्छा रहा। मेरी तबीयत थोड़ी खराब थी लेकिन जैसे ही चौका लगा मैं बिल्कुल ठीक हो गया। बहुत खुशी की बात है। कल मैंने पूरा मैच देखा।” pic.twitter.com/8nTSmufNsJ
— ANI_HindiNews (@AHindinews) September 29, 2025
“आणखी काही महत्त्वाचं नाही, मात्र एक बॉल महत्त्वाचा आहे. मला तोच बॉल हवा होता ज्यावर मी चौकार लगावला. सर्वांनाच माहितीय की मी फिनिशर आहे. टीमच्या विजयामुळे मी फार आनंदी आहे”, अशा शब्दात रिंकूने आनंद व्यक्त केला.
कुलदीप यादव याने सर्वाधिक 4 विकेट्स घेत पाकिस्तानला 146 धावांवर रोखण्यात प्रमुख भूमिका बजावली. त्यानंतर भारताची निराशाजनक सुरुवात झाली. अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल स्वस्तात आऊट झाले. त्यामुळे भारताची 3 आऊट 20 अशी स्थिती झाली. त्यानंतर तिलक वर्मा याने संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांच्यासह चौथ्या आणि पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आणि भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. संजूने 24 आणि शिवमने 33 धावा केल्या. त्यानंतर तिलक आणि संजूने भारताला विजयापर्यंत पोहचवलं. तिलकने नाबाद 69 धावांचं योगदान दिलं. तर रिंकू 4 धावांवर नाबाद परतला.