
कोलकाता : विजय शंकरच्या दमदार बॅटिंगच्या बळावर गुजरात टायटन्सने कोलकाता नाइट रायडर्सवर 7 विकेट आणि 13 चेंडू राखून मोठा विजय मिळवला. केकेआरच 180 धावांच टार्गेट गुजरातने 17.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. विजय शंकरने 24 चेंडूत नाबाद 51 धावा फटकावल्या. यात 2 फोर आणि 5 सिक्स आहे. दुसऱ्याबाजूने डेविड मिलरने त्याला साथ दिली. 18 चेंडूत नाबाद 32 धावा करताना मिलरने 2 फोर आणि 2 सिक्स मारल्या.
त्याआधी शुभमन गिलने गुजरातला चांगली सुरुवात दिली. शुभमन गिलची हाफ सेंच्युरी अवघ्या 1 रन्सने हुकली. सुनील नरेनच्या गोलंदाजीवर गिलने रसेलकडे झेल दिला. 35 चेंडूत 49 धावा करताना त्याने 8 चौकार मारले. हार्दिक पंड्याने 20 चेंडूत त्याने 26 धावा केल्या. त्याने 2 फोर, 1 सिक्स मारला.
दरम्यान केकेआरने रहमनुल्लाह गुरबाजच्या 39 चेंडूत (81) धावांच्या शानदार बॅटिंगच्या बळावर गुजरात टायटन्सला विजयासाठी 180 धावांच लक्ष्य दिलं होतं. केकेआरने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 179/7 धावा केल्या होत्या. अखेरच्या ओव्हर्समध्ये आंद्रे रसेलने 19 चेंडूत 34 धावा केल्या. यात 2 फोर आणि 3 सिक्स होते.
विजय शंकरच्या दमदार बॅटिंगच्या बळावर गुजरात टायटन्सने कोलकाता नाइट रायडर्सवर 7 विकेट आणि 13 चेंडू राखून मोठा विजय मिळवला. केकेआरच 180 धावांच टार्गेट गुजरातने 17.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. विजय शंकरने 24 चेंडूत नाबाद 51 धावा फटकावल्या. यात 2 फोर आणि 5 सिक्स आहे. दुसऱ्याबाजूने डेविड मिलरने त्याला साथ दिली. 18 चेंडूत नाबाद 32 धावा करताना मिलरने 2 फोर आणि 2 सिक्स मारल्या.
वरुण चक्रवर्तीने 17 वी ओव्हर टाकली. विजय शंकरने या ओव्हरमध्ये सलग 2 चेंडूवर 2 सिक्स मारले. 16 ओव्हरमध्ये गुजरातच्या 3 बाद 166 धावा झाल्या आहेत. डेविड मिलर 30 आणि विजय शंकर 40 धावांवर खेळतोय. या ओव्हरमध्ये 24 धावा वसूल केल्या.
गुजरातला विजयासाठी 24 चेंडूत 38 धावांची गरज आहे. 16 ओव्हरमध्ये गुजरातच्या 3 बाद 142 धावा झाल्या आहेत. डेविड मिलर 29 आणि विजय शंकर 21 धावांवर खेळतोय.
गुजरातला एका मोठ्या ओव्हरची गरज होती. सुयश शर्माच्या गोलंदाजीवर गुजरातने 18 धावा वसूल केल्या. 15 ओव्हर अखेरीस गुजरातच्या 3 बाद 129 धावा झाल्या आहेत. डेविड मिलर 13 बॉल 26 आणि विजय शंकर 12 बॉलमध्ये 12 धावांवर खेळतोय.
अरेरे, शुभमन गिलची हाफ सेंच्युरी अवघ्या 1 रन्सने हुकली. सुनील नरेनच्या गोलंदाजीवर गिलने रसेलकडे झेल दिला. 35 चेंडूत 49 धावा करताना त्याने 8 चौकार मारले.
हार्दिक पंड्या आऊट झाला. 20 चेंडूत त्याने 26 धावा केल्या. त्याने 2 फोर, 1 सिक्स मारला. गुजरातची दुसरी विकेट गेली आहे. गुजरातच्या 11 ओव्हर अखेरीस 92/2 धावा झाल्या आहेत. हार्दिक हार्षित राणाच्या गोलंदाजीवर LBW आऊट झाला.
10 ओव्हर्समध्ये गुजरातच्या एक बाद 89 धावा झाल्या आहेत. शुभमन गिल 33 चेंडूत 48 आणि कॅप्टन हार्दिक 17 चेंडूत 25 धावांवर खेळतोय.
8 ओव्हर्समध्ये गुजरातच्या एक बाद 70 धावा झाल्या आहेत. शुभमन गिल 28 चेंडूत 44 आणि कॅप्टन हार्दिक 10 धावांवर खेळतोय.
पावरप्लेच्या 6 ओव्हर्समध्ये गुजरातच्या एक बाद 52 धावा झाल्या आहेत. शुभमन गिल 20 चेंडूत 35 आणि कॅप्टन हार्दिक 5 धावांवर खेळतोय.
चांगल्या सुरुवातीनंतर वृद्धीमान साहाच्या रुपाने गुजरातला पहिला धक्का बसला आहे. आंद्रे रसेलने साहाला हर्षित राणाकरवी 10 धावांवर झेलबाद केलं. 5 ओव्हर अखेरीस गुजरातच्या 1 बाद 47 धावा झाल्या आहेत. ओपनर शुभमन गिल 17 चेंडूत 30 धावांवर खेळतोय. त्याने 6 चौकार मारले.
रहमनुल्लाह गुरबाजच्या 39 चेंडूत (81) धावांच्या शानदार बॅटिंगच्या बळावर केकेआरने गुजरात टायटन्सला विजयासाठी 180 धावांच लक्ष्य दिलं आहे. केकेआरने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 179/7 धावा केल्या. अखेरच्या ओव्हर्समध्ये आंद्रे रसेलने 19 चेंडूत 34 धावा केल्या. यात 2 फोर आणि 3 सिक्स आहेत.
मागच्या सामन्यात गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई करणारा रिंकू सिंह आज फ्लॉप ठरला. तो 20 चेंडूत 19 रन्सवर आऊट झाला. रिंकूने आज फक्त 1 सिक्स मारला. नूर अहमदच्या गोलंदाजीवर लिटिलने रिंकूची कॅच घेतली. 18 ओव्हर अखेरीस केकेआरच्या 156 धावा झाल्या आहेत.
16 ओव्हर अखेरीस केकेआरच्या 5 बाद 137 धावा झाल्या आहेत. याच ओव्हरमध्ये धोकादायक गुरबाज 81 रन्सवर आऊट झाला. त्याने 39 चेंडूत 81 धावा केल्या. नूर अहमदच्या गोलंदाजीवर राशिद खानने त्याचा झेल घेतला. त्याने 5 फोर, 7 सिक्स मारले.
रहमनुल्लाह गुरबाजने सिक्स मारुन केकेआरच धावांच शतक पूर्ण केलं. 13 ओव्हर अखेरीस केकेआरची स्थिती 105/4 अशी आहे. गुरबाज 33 चेंडूत 67 धावांवर खेळतोय. त्याला रिंकू सिंह साथ देतोय.
एकाच ओव्हरमध्ये केकेआरच्या दोन विकेट गेल्या आहेत. 11 व्या ओव्हरमध्ये आधी वेंकटेश अय्यरच्या रुपाने केकेआरला तिसरा धक्का बसला. त्याने 14 चेंडूत (11) धावा केल्या. जोश लिटिलने त्याला LBW बाद केलं. त्यानंतर कॅप्टन नितीश राणाला (4) लिटिलने तेवतियाकरवी झेलबाद केलं. 11 ओव्हर अखेरीस केकेआरची 88 /4 स्थिती आहे.
9 ओव्हरमध्ये केकेआरच्या 2 बाद 80 धावा झाल्या आहेत. रहमनुल्लाह गुरबाज (51) आणि वेंकटेश अय्यरची (9) जोडी मैदानात आहे. गुरबाजने 27 चेंडूत हाफ सेंच्युरी झळकवताना 4 फोर आणि 4 सिक्स मारले.
पावरप्लेमध्ये केकेआरच्या 61/2 धावा झाल्या आहेत. रहमनुल्लाह गुरबाज गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई करतोय. त्याने 15 चेंडूत नाबाद 39 धावा करताना 2 फोर आणि 4 सिक्स मारले आहेत. वेंकटेश अय्यर आता मैदानात आला आहे.
शार्दुल ठाकरुच्या रुपाने केकेआरचा दुसरा विकेट गेला आहे. त्याला भोपळाही फोडता आला नाही. शमीच्या गोलंदाजीवर मोहित शर्माने शार्दुलची पळत जाऊन जबरदस्त कॅच पकडली.
मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर नारायण जगदीशन (19) LBW आऊट झाला. त्याने 15 चेंडूत 19 धावा करताना 4 चौकार लगावले. 3 ओव्हरमध्ये केकेआरच्या 23/1 धावा झाल्या आहेत.
केकेआरने दोन ओव्हरमध्ये बिनबाद 16 धावा केल्या आहेत. नारायण जगदीशन (13) आणि रहमनुल्लाह गुरबजाज (2) रन्सवर खेळतोय.
रहमनुल्लाह गुरबाज, एन जगदीशन, वेंकटेश अय्यर, नीतीश राणा (कॅप्टन), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, डेविड विस, शार्दुल ठाकुर, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
ऋद्धिमान साहा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), डेविड मिलर, अभिनव मनोहर, विजय शंकर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, जॉश लिटिल, नूर अहमद
टॉस नंतर कोलकाता येथे मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे सामना उशिराने सुरु होणार आहे. सध्या पाऊस थांबलाय. पण आकाशात अजूनही काळे ढग आहेत.
मागच्या सामन्यात केकेआरने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला होता. रिंकू सिंहने लास्ट ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये 5 सिक्स मारुन मॅच फिरवली होती.
कोलकाताच्या इडन गार्डन्सवर आजचा सामना होत असून गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याने टॉस जिंकला असून त्याने पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.