KKR vs RR : 6,6,6,6,6,6, आंद्रे रसेलचं वादळ, राजस्थानसमोर 207 धावांचं आव्हान

Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals 1st Innings Highlights : आंद्रे रसेल याने अखेरच्या काही षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी करत नाबाद अर्धशतकी खेळी केली. आंद्रेने या खेळीत 6 षटकार लगावले. अशाप्रकारे केकेआरने 200 पार मजल मारली.

KKR vs RR : 6,6,6,6,6,6, आंद्रे रसेलचं वादळ, राजस्थानसमोर 207 धावांचं आव्हान
Andre Russell Fifty KKR vs RR
Image Credit source: IPL X Account
| Updated on: May 04, 2025 | 5:44 PM

आंद्रे रसेल आणि रिंकु सिंह या स्फोटक जोडीने अखेरच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने घरच्या मैदानात ईडन गार्डन्समध्ये 200 पार मजल मारली आहे. केकेआरने राजस्थान रॉयल्ससमोर 207 धावांचं आव्हान ठेवलं आहे. कोलकाताने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 206 धावा केल्या. कोलकाताच्या 6 फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली. केकेआरसाठी आंद्रे रसेल याने निर्णायक क्षणी सर्वाधिक धावा केल्या. तर रिंकु सिंह याने चांगली साथ दिली. तर त्याआधी इतर फलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे बजावली. त्यामुळे आता केकेआरच्या फलंदाजांनंतर गोलंदाजांवर टीमला विजयी करण्याची जबाबदारी असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला राजस्थानचे फलंदाज हे आव्हान गाठण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

केकेआरची बॅटिंग

केकेआरने अंगकृष रघुवंशी याच्या रुपात 18.1 ओव्हरमध्ये 172 धावांवर चौथी विकेट गमावली. त्यानंतर उर्वरित 11 बॉलमध्ये रिंकु सिंह आणि आंद्रे रसेल या जोडाीने पाचव्या विकेटसाठी 34 रन्सची पार्टनरशीप केली. आंद्रे रसेल याने 25 बॉलमध्ये 228 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 57 रन्स केल्या. रसेलने या खेळीत 4 चौकार आणि 6 षटकार लगावले. तर रिंकु सिंह याने 6 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 1 फोरसह नॉट आऊट 19 रन्स केल्या.

त्याआधी अंगकृष रघुवंशी याने 31 चेंडूत 5 चौकारांसह 141.94 च्या स्ट्राईक रेटने 44 धावा जोडल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे याने 24 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 1 फोरसह 30 रन्स जोडल्या. सुनील नारायण 11 धावांवर बाद झाला. तर ओपनर रहमानुल्लाह गुरुबाज याने 25 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 4 फोरसह 35 रन्स केल्या. तर राजस्थानकडून जोफ्रा आर्चर, महीश तीक्षणा, यु्द्धवीर सिंह आणि कर्णधार रियान पराग या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

राजस्थानसमोर 207 धावांचं आव्हान

केकेआरसाठी ‘करो या मरो’ स्थिती

दरम्यान राजस्थानचा हा या मोसमातील 12 वा तर कोलकाताचा 11 वा सामना आहे. राजस्थानचं या हंगामातील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे राजस्थानकडे गमावण्यासाठी काहीच नाही. तर दुसऱ्या बाजूला कोलकाताच्या खात्यात 9 गुण आहेत. त्यामुळे कोलकाताकडे प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. त्यामुळे कोलकातासाठी राजस्थान विरुद्धचा सामना हा ‘करो या मरो’ असला आहे. त्यामुळे केकेआर 206 धावांचा यशस्वी बचाव करणार की राजस्थान विजय मिळवून कोलकाताचा गेम बिघडवणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.