KL Rahul : लग्नाच्या 3 दिवसानंतर केएल राहुलने केलं पहिलं वजनदार काम, VIDEO

KL Rahul : टीम इंडियाचा स्टार खेळाडू केएल राहुल नुकताच विवाहबद्ध झाला. अभिनेत्री आथिया शेट्टी सोबत 23 जानेवारीला खंडाळा येथील फार्म हाऊसवर तो विवाह बंधनात अडकला. आथिया शेट्टी अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे.

KL Rahul : लग्नाच्या 3 दिवसानंतर केएल राहुलने केलं पहिलं वजनदार काम, VIDEO
KL Rahul and Athiya Shetty
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 27, 2023 | 9:18 AM

बंगळुरु – टीम इंडियाचा स्टार खेळाडू केएल राहुल नुकताच विवाहबद्ध झाला. अभिनेत्री आथिया शेट्टी सोबत 23 जानेवारीला खंडाळा येथील फार्म हाऊसवर तो विवाह बंधनात अडकला. आथिया शेट्टी अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे. सुनील शेट्टीच्या लोणावळ्यातील फार्म हाऊसवर हे लग्न झालं. लग्नाला चार दिवस होत नाही, तोच केएल राहुलने उड्या मारायला सुरुवात केलीय. राहुलने त्याचा व्हिडिओ सुद्धा शेअर केलाय. सध्या केएस राहुलच शेड्युल खूप व्यस्त आहे. त्याने न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरीजमधून विश्रांती घेऊन लग्न केलं. आता टीम इंडियासमोर पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाच आव्हान आहे. राहुलने लग्नानंतर लगेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरीजची तयारी सुरु केलीय.

तीन दिवसात मेहनत सुरु

राहुलने जीममध्ये घाम गाळायला सुरुवात केली आहे. आपल्या ट्रेनिंगचा व्हिडिओ त्याने शेअर केलाय. लग्नामुळे तो न्यूझीलंड विरुद्धच्या संपूर्ण सीरीजमध्ये खेळणार नाहीय. वनडे आणि टी 20 सीरीजसाठी त्याची निवड झालेली नाही. आता 2 फेब्रुवारीला तो टीमसोबत जॉईन होईल. जीममध्ये तो ट्रेडमिल आणि वेट ट्रेनिंग करतोय. राहुलने वजनाचा भार उचलला.


मायदेशात टीम इंडियाने शेवटचा कसोटी सामना कधी खेळला?

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 4 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. सीरीजमधला पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून नागपूरमध्ये सुरु होईल. त्याआधी तो मुंबईमध्ये टीम इंडियाच्या स्क्वॉडमध्ये दाखल होईल. सीरीज सुरु होण्याआधी टीम इंडियाचा 4 दिवसांचा कॅम्प असेल. भारताला मायदेशात कसोटी सामना खेळून 10 महिने झालेत. कॅम्पमध्ये प्लेयर्सना लाल बॉलने सरावाची संधी मिळाले.

राहुलवर मोठी जबाबदारी

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत केएल राहुलवर मोठी जबाबदारी असेल. मागच्यावर्षी ऋषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी झाल. त्याला मैदानावर परतण्यासाठी काही महिने लागतील. अशावेळी पंतची उणीव जाणवू न देण्याची जबाबदारी केएल राहुलवर असेल. बांग्लादेश दौऱ्यावर केएल राहुल फ्लॉप ठरला होता. 4 टेस्ट मॅचची ही सीरीज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 चा भाग आहे. फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी टीम इंडिया कमीत कमी 3 सामने जिंकावे लागतील.