KKR vs RCB : केकेआरचा 1 रनने थरारक विजय, आरसीबीचं पॅकअप

IPL 2024 KKR vs RCB Highlights In Marathi : कोलकाताने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीने जोरदार लढाई दिली. मात्र आरसीबीचे प्रयत्न अवघ्या 1 धावेने कमी पडले.

KKR vs RCB : केकेआरचा 1 रनने थरारक विजय, आरसीबीचं पॅकअप
kkr won against rcb ipl 2024,
Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: Apr 21, 2024 | 8:17 PM

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 36 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 1 धावेने थरारक विजय मिळवला आहे. कोलकाताने आरसीबीला विजयासाठी 223 धावांचं आव्हान दिलं होतं. आरसीबीने या धावांचा शेवटच्या बॉलपर्यंत पाठलाग केला. मात्र आरसीबीचे प्रयत्न हे अवघ्या 1 धावेने अपुरे ठरले. आरसीबीला 20 ओव्हरमध्ये ऑलआऊट 221 धावांपर्यंत मजल मारता आली. केकेआरचा हा पाचवा विजय ठरला. आरसीबीने पराभवाची हॅटट्रिक पूर्ण केली. आरसीबीचं या पराभवासह आयपीएलच्या 17 व्या मोसमातून पॅकअप झालं.

आरसीबीला विजयासाठी अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 21 धावांची गरज होती. मिचेल स्टार्कने ही अखेरची ओव्हर टाकली. स्टार्कच्या बॉलिंगवर कर्ण शर्मा याने 3 सिक्स खेचले. त्यामुळे सामना आणखी रंगतदार झाला. मात्र पाचव्या बॉलवर स्टार्कने कर्ण शर्माला आपल्याच बॉलिंगवर कॅच आऊट केलं. त्यामुळे आरसीबीला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 3 धावांची गरज होती. कर्ण आऊट झाल्यानंतर लॉकी फर्ग्यूसन मैदानात आला. तर त्याच्यासोबत मोहम्मद सिराज होता. लॉकीने फटका मारुन पहिली धाव पूर्ण केली. तर दुसरी धाव पूर्ण करताना स्ट्राईक एंडवर रन आऊट झाला. आरसीबीने दुसरी धाव पूर्ण केली असती तर सामन्याचा निकाल सुपर ओव्हरने लागला असता.

आरसीबीची विजयी धावांचा पाठलाग करताना खास सुरुवात झाली नाही. आरसीबीने 35 धावांवर विराट कोहली आणि कॅप्टन फाफ डु प्लेसीस या दोघांची विकेट गमावली. त्यानंतर विल जॅक्स आणि रजत पाटीदार या दोघांनी 102 धावांची शतकी भागीदारी केली. जॅक्सने 4 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने 32 बॉलमध्ये 55 धावा केल्या. तर पाटीदारने 23 बॉलमध्ये 3 चौकार आणि 5 सिक्ससह 53 धावांची खेळी केली. जॅक्स आऊट झाल्यानंतर कोलकाताने जोरदार कमबॅक केलं. आरसीबीची 6 बाद 155 अशी स्थिती झाली.

त्यानंतर सुयश प्रभुदेसाई आणि दिनेश कार्तिक या दोघांनी सातव्या विकेटसाठी 32 धावा जोडल्या. त्यामुळे सामना रंगतदार स्थितीत पोहचला. मात्र कार्तिक आणि प्रभुदेसाई आऊट झाल्याने केकेआर सामना जिंकलेच, अशी स्थिती होती. मात्र अखेरच्या ओव्हरमध्ये कर्ण शर्माने 3 सिक्स ठोकून आरसीबीच्या विजयाचा आशा कायम ठेवल्या. मात्र कर्ण शर्माला मिचेल स्टार्कने कॅच आऊट केलं आणि आरसीबीच्या आशा मावळल्या.

त्यानंतर अखेरच्या बॉलवर विजयासाठी 3 धावांची गरज असताना लॉकी फर्ग्यूस दुसरी धाव घेतना रन आऊट झाला आणि केकेआर विजयी झाली. केकेआरकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. हर्षित राणा आणि सुनील नरेन या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्क आणि वरुण चक्रवर्थी या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

केकेआरची बॅटिंग

दरम्यान त्याआधी आरसीबीने टॉस जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं. केकेआकडून कॅप्टन श्रेयस अय्यर याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. श्रेयसने 36 बॉलमध्ये 50 धावा केल्या. फिलिप सॉल्ट याने 14 बॉलमध्ये 48 धावांचं योगदान दिलं. वेंकटेश अय्यर 16 आणि सुनील नरेन याने 10 धावांचं योगदान दिलं. तर अखेरच्या 3 फलंदाजांनी निर्णायक खेळी केली. रिंकू सिंह याने 24 धावा केल्या. तर आंद्रे रसेल आणि रमनदीप सिंह या दोघांनी अनुक्रमे नाबाद 27 आणि रमनदीप सिंह याने 24 धावा केल्या. तर आरसीबीकडून यश दयाल आणि कॅमरुन ग्रीन या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज आणि लॉकी फर्ग्यूसन या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट
गेली.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल आणि मोहम्मद सिराज.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा.