
बीसीसीआयच्या कठोर धोरणानंतर देशांतर्गत क्रिकेटचं महत्त्व वाढलं आहे. दिग्गज क्रिकेटपटूही देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसत आहेत. दुलीप ट्रॉफीत रोहित शर्मा आणि विराट कोहली वगळता जवळपास सर्वच खेळाडू खेळत आहेत. दुसरीकडे, प्रत्येक राज्यात त्या त्या क्रिकेट असोसिएशनच्या लीग सुरु आहेत. दिल्लीत दिल्ली प्रीमियर लीग सुरु आहे. अशीच कर्नाटकमध्ये महाराजा टी20 ट्रॉफी सुरु आहे. या स्पर्धेतील एका सामन्यात सुपर ओव्हरचा थरार प्रेक्षकांना अनुभवयाला मिळाला. हा थरार एक दोन वेळा नाही तर तीन वेळा अनुभवायला मिळाला. त्यामुळे प्रेक्षकांची धाकधूक तर वाढली, त्याचबरोबर मनोरंजनही झालं. बंगळुरु ब्लास्टर्स आणि हुबळी टायगर्स यांच्यात हा सामना पार पडला. मयंक अग्रवालच्या हाती बंगळुरु ब्लास्टर्स, तर मनीष पांडेच्या हाती हुबळी टायगर्सची धुरा आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल बंगळुरु ब्लास्टर्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याच निर्णय घेतला.
हुबळी टायगर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सर्वबाद 164 धावा केल्या आणि विजयासाठी 165 धावा दिल्या. पण बंगळुरु ब्लास्टर्सला 20 षटकात 9 गडी गमवून 164 धावा करता आल्या आणि सामना बरोबरीत सुटला. शेवटच्या षटकात सहा धावांची गरज होती. तेव्हा पहिल्याच चेंडूवर नवीनने चौकार मारला आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट पडली. 4 चेंडू आणि 2 धावा अशी स्थिती असताना लविश कौशलने दोन चेंडू निर्धाव घालवले. पाचव्या चेंडूवर एक धाव घेत क्रांथी कुमारला स्ट्राईक दिली. सहाव्या चेंडूवर धाव घेताना रनआऊट झाला आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
पहिली सुपर ओव्हर : बंगळुरु ब्लास्टर्सने प्रथम फलंदाजी करताना 1 गडी बाद 10 धावा केल्या आणि विजयासाठी 11 धावा दिल्या. पहिल्या चेंडूवर मयंक अग्रवाल बाद, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर एक धाव, चौथा चेंडू निर्धाव, पाचवा चेंडू वाईड, पुन्हा टाकलेल्या पाचव्या चेंडूवर 2 धावा आणि सहाव्या चेंडूवर षटकार मारला. हुबळी टायगर्सने धावांचा पाठलाग करताना पहिल्या तीन चेंडूवर एक एक धाव घेतली. चौथ्या चेंडूवर षटकार मारला. पाचवा चेंडू निर्धाव गेला आणि सहाव्या चेंडूवर 1 धाव आली. यामुळे ही सुपर ओव्हर बरोबरीत सुटली.
Friday night frenzy at the @maharaja_t20: Not one, not two, but THREE Super Overs were needed for Hubli Tigers to finally win against Bengaluru Blasters 🤯🤯🤯#MaharajaT20onFanCode #MaharajaTrophy #MaharajaT20 pic.twitter.com/ffcNYov1Qf
— FanCode (@FanCode) August 23, 2024
दुसरी सुपर ओव्हर : हुबळी टायगर्स संघ प्रथम फलंदाजीसाठी आला. मनिष पांडेन पहिल्या चेंडूवर 1 धाव घेतली. दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथ्या चेंडूवर 2 धावा, पाचव्या चेंडूवर 2 धावा आणि सहाव्या चेंडूवर दोन धावा आल्या. अशा 6 चेंडूत 8 धावा आल्या आणि 9 धावांचं आव्हान दिलं. बंगळुरु टायगर्सने पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडूवर रनआऊट, चौथा चेंडू 1 धाव, पाचवा चेंडू 1 धाव आणि सहावा चेंडू 1 धाव अशा 8 धावा केल्या आणि सामना बरोबरीत सुटला.
तिसरी सुपर ओव्हर : बंगळुरु ब्लास्टर्स फलंदाजीसाठी आला आणि पहिल्या चेंडूवर विकेट दिली. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसरा चेंडू वाईड, पुन्हा टाकलेला तिसरा चेंडूवर 1 धाव, चौथ्या चेंडूवर 2 धावा, पाचव्या चेंडूवर 1 धाव आणि सहाव्या चेंडूवर सिक्स मारला. अशा 12 धावा करत 13 धावांचं आव्हान दिलं. हुबळी टायगर्सने पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 4 धावा, तिसऱ्या चेंडूवर 1, चौथा चेंडू निर्धाव, पाचवा चेंडू वाईड, पुन्हा टाकलेला पाचवा चेंडू 1 धाव आणि सहाव्या चेंडूवर चौकार मारला. यासह हुबली टायगर्सने तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला.
हुबळी टायगर्स (प्लेइंग इलेव्हन): थिप्पा रेड्डी, मोहम्मद ताहा, कृष्णन श्रीजीथ (विकेटकीपर), मनीष पांडे (कर्णधार), मनवंत कुमार एल, एलआर कुमार, अनेश्वर गौतम, कार्तिकेय केपी, केसी करिअप्पा, विद्वत कवेरप्पा, श्रीशा आचार
बंगळुरू ब्लास्टर्स (प्लेइंग इलेव्हन): मयंक अग्रवाल (कर्णधार), सूरज आहुजा, अनिरुद्ध जोशी, निरंजन नाईक, शिवकुमार रक्षित (विकेटकीपर), क्रांती कुमार, शुभांग हेगडे, नवीन एमजी, लॅविश कौशल, मोहसीन खान, संतोक सिंग