आयपीएल 2025 स्पर्धेत खेळणार की नाही? महेंद्रसिंह धोनीने दिलं असं उत्तर

आयपीएल 2025 स्पर्धेसाठी तयारी सुरु झाली आहे. मेगा लिलावासाठी बीसीसीआय आणि आयपीएल फ्रेंचायझी यांच्यात खलबतं सुरु आहेत. असं असताना महेंद्रसिंह धोनीने आयपीएल 2025 स्पर्धेत खेळण्याबाबत मोठं विधान केलं आहे. बीसीसीआय आणि आयपीएल फ्रेंचायझी यांच्या बैठकीनंतर निर्णय घेईल, असं महेंद्रसिंह धोनीने सांगितलं.

आयपीएल 2025 स्पर्धेत खेळणार की नाही? महेंद्रसिंह धोनीने दिलं असं उत्तर
| Updated on: Aug 01, 2024 | 7:35 PM

आयपीएल 2025 स्पर्धेत महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात मागचं पर्व काही खास राहिलं नव्हतं. त्यामुळे पुढच्या पर्वात खेळणार की नाही याबाबत चर्चा सुरु झाली आहे. असं असताना महेंद्रसिंह धोनी 7 जुलैला 43 वर्षांचा झाला आहे. महेंद्रसिंह धोनी 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पण अजूनही इंडियन प्रीमियर लीग अजूनही खेळत आहे. महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्सला पाचवेळा जेतेपद मिळवून दिलं आहे. पण गेल्या चार वर्षात महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबत बरंच काही समोर आलं आहे. पण प्रत्येक वेळी महेंद्रसिंह धोनी मैदानात खेळताना दिसला. या दरम्यान महेंद्रसिंह धोनी आयपीएल निवृत्तीबाबत मोठं विधान केलं आहे. आता आयपीएलच्य रिटेंशन आणि नियमांची वाट पाहात आहे. महेंद्रसिंह धोनीने एका कार्यक्रमात याबाबत आपलं मत व्यक्त केलं. बीसीसीआयने आगामी आयपीएल लिलावासाठी प्रक्रिया आणि नियम ठरवण्यासाठी मुंबईत सर्व दहा आयपीएल फ्रँचायझी मालकांसोबत बैठक घेतली.

महेंद्रसिंह धोनीने सांगितलं की, ‘आता चेंडू आमच्या पारड्यात नाही. एकदा का नियम जाहीर झाले की मी निर्णय घेईन. हा निर्णय संघाच्या हिताचा असणार आहे.’ आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी महेंद्रसिंह धोनी एक दिवसाआधी कर्णधारपदावरून पायउतार झाला. तसेच कर्णधारपदाची माळ ऋतुराज गायकवाड याच्या गळ्यात पडली. दरम्यान महेंद्रसिंह धोनीने बुमराह आवडता गोलंदाज असल्याचं सांगितलं. “जसप्रीत बुमराह माझा आवडता गोलंदज आहे. पण सध्याच्या काळात फलंदाज निवडणे अवघड आहे. पण याचा अर्थ असा नाही की चांगले गोलंदाज नाहीत.” जसप्रीत बुमराहने टी20 वर्ल्डकपमध्ये जबरदस्त गोलंदाजी करत 8 डावात 15 गडी बाद केले होते. त्याला या कामगिरीसाठी प्लेयर ऑफ द टूर्नामेंटने गौरविण्यात आलं होतं.

“फलंदाजापैकी एकाची निवड करणं कठीण आहे. मी ज्यांना फलंदाजी करताना पाहतो ते चांगले खेळत आहेत. जोपर्यंत टीम इंडिया जिंकत आहे तिथपर्यंत मला एकही फलंदाज निवडायचा नाही. मला आशा आहे की ते संघासाठी धावा करत राहतील.”, असं महेंद्रसिंह धोनीने सांगितलं.