AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup: स्पर्धेच्या सुरुवातीपासून मार्कस-मॅथ्यूनेच ऑस्ट्रेलियाला तारलं, योगायोग पाहून चकित व्हाल

दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान संघाला मात देत अंतिम सामन्यात झेप घेतली. पण या विजयाचे खरे शिल्पकार ठरले मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉयनिस.

T20 World Cup: स्पर्धेच्या सुरुवातीपासून मार्कस-मॅथ्यूनेच ऑस्ट्रेलियाला तारलं, योगायोग पाहून चकित व्हाल
मार्कस आणि मॅथ्यू
| Edited By: | Updated on: Nov 12, 2021 | 6:36 PM
Share

T20 World Cup 2021: टी विश्वचषका स्पर्धेत (T20 World Cup 2021) कमालीच्या फॉर्ममध्ये असलेल्या पाकिस्तानला नमवत ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये झेप घेतली आहे. ऑसीसीनी सेमीफायनलच्या सामन्यात 5 विकेट्सनी पाकिस्तानला पराभूत केलं आहे. पण या सामन्याचे खरे हिरो ठरले आहेत ऑस्ट्रेलियाचे फलंदाज मार्कस स्टॉयनिस आणि मॅथ्यू वेड. या दोघांनी नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाचा विजय पक्का केला. मॅथ्यूने तर 19 व्या षटकात लागोपाठ 3 षटकार ठोकत संघाचा विजय सोपा केला. आता ऑस्ट्रेलियाचा सामना रविवारी (14 नोव्हेंबर) न्यूझीलंडशी (New zealand vs Australia) होणार आहे.

दरम्यान सेमीफायनलसारख्या महत्त्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ अडचणीत सापडला असताना मॅथ्यू आणि मार्कसने संघाला तारलं. विशेष म्हणजे यंदाच्या विश्वचषकात असं दुसऱ्यांदा झालं आहे. सर्वात पहिल्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयासाठा काही धावांची गरज असताना या दोघांनी नाबाद खेळी केली होती. त्यावेळी मार्कसने नाबाद 24 तर मॅथ्यूने नाबाद 15 धावा केल्या होत्या. ज्यानंतर पाकविरुद्धच्या सेमीफायनलसामन्यात तर  मार्कसने नाबाद 40 तर मॅथ्यूने नाबाद 41 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे दोन्ही वेळी ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्सनीच विजय मिळवला आहे.

… म्हणून पाकिस्तानने गमावला सामना 

सेमीफायनलच्या पाक विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात 19 व्या षटकात मॅथ्यूच्या तुफान सिक्सेसमुळे पाकला सामना पाकला गमवावा लागला. पण याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पाकिस्तानच्या हसन अलीने मॅथ्यूचा एक झेल देखील सोडला. जो सामन्यात टर्निंग पॉईंट ठरला. कारण ती कॅच घेतली असती तर पुढील षटकार मॅथ्यू मारु शकला नसता आणि पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला नसता. मात्र माझा झेल जरी घेतला असता तरी आम्ही तेव्हा मजबूत स्थितीमध्ये होतो. जिंकण्याचा पूर्ण आत्मविश्वास होता. त्यामुळे आम्हाला फारसा फरक पडला नसता आम्हीच जिंकलो असतो अशी प्रतिक्रिया मॅथ्यूने दिली आहे.

इतर बातम्या

T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहम्मद रिजवानचं अर्धशतक, 1000 धावा करत रचला इतिहास

England vs New Zealand T20 world cup Result: चुरशीच्या सामन्यात न्यूझीलंडची इंग्लंडवर सरशी, 5 विकेट्सने मात देत मिळवली अंतिम सामन्यात जागा

IND vs NZ : भारतीय कसोटी संघात नवा मुंबईकर, न्यूझीलंडविरुद्ध करणार पदार्पण

(Marcus and mathew helps australia from starting of the session first against south africa now against pakistan)

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक