AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Australia vs Pakistan: 6,6,6,6,4,4,4…फखर जमान नावाचं वादळ, 15 चेंडूत पलटला खेळ

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडत असलेल्या सामन्यात फखार जमानने केलेल्या तुफानी खेळीने सामन्यांचा रंगच बदलून टाकला आहे.

Australia vs Pakistan: 6,6,6,6,4,4,4…फखर जमान नावाचं वादळ, 15 चेंडूत पलटला खेळ
फखार जमान
| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 10:24 PM
Share

T20 World Cup 2021 : टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली आहे. पुन्हा एकदा यंदाच्या स्पर्धेत त्यांच वर्चस्व का आहे हे दाखवून दिलं आहे. पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया संघासमोर 177 धावांच आव्हान ठेवलं आहे. यामध्ये सलामीवीर मोहम्मद रिजवानचं अर्धशतक जितकं महत्त्वाचं आहे, तितकचं अखेरच्या काही षटकात तुफानी फलंदाजी करत अनुभवी फखर जमानने झळकावलेलं अर्धशतकही आहे.  रिजवानने 52 चेंडूत 67 धावांची तर फखर जमानने 32 चेंडूत 55 धावांची खेळी केली आहे.

मोहम्मद रिजवानच्या अर्धशतकाने पाकिस्तानला चांगली सुरुवात करु दिली. पण खरी फिनिशींग फखरच्या अर्धशतकानेच दिली. विशेष म्हणजे यंदाच्या स्पर्धेत फखर खेळत नसल्याने त्याला ट्रोल केलं जात होतं. पण आज अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात फखरने केलेल्या तुफानी खेळीने त्याने सर्वांची तोंडं बंद केली आहेत. त्याची आता सोशल मीडियावर वाह, वाह होत आहे.

फखर जमानची तुफानी खेळी

फखर जमान बाबर आजम बाद झाल्यानंतर फलंदाजीला आला. सुरुवातीला रिजवान फटकेबाजी करत असताना जमान शांत होता. पहिल्या 17 चेंडूत त्याने केवळ 17 रन केले. पण अखेरच्या काही षटकात त्याने गिअर वाढवत तुफान खेळी केली. मिचेल स्टार्कच्या 2 ओव्हरमध्ये तीन षटकार ठोकत 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. शेवटच्या 15 चेंडूत फखरने 38 धावा केल्या.

इतर बातम्या

T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहम्मद रिजवानचं अर्धशतक, 1000 धावा करत रचला इतिहास

England vs New Zealand T20 world cup Result: चुरशीच्या सामन्यात न्यूझीलंडची इंग्लंडवर सरशी, 5 विकेट्सने मात देत मिळवली अंतिम सामन्यात जागा

विराट कोहलीच्या चिमुरडीला बलात्काराच्या धमक्या देणारा ताब्यात, मुंबई पोलिसांची हैद्राबादमध्ये कारवाई, आरोपी आहे IIT पासआऊट

(fakhar zaman smashed fast fifty in semi final match against australia)

पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.