BBL: नशीब! कॅच पकडण्याच्या नादात डोळा गेला असता, पहा VIDEO
BBL: सुदैवाने त्याचा डोळा वाचला. कुठल्या मैदानात, कुठल्या सामन्यात हे घडलं? 11 व्या ओव्हरमध्ये ही दुर्घटना घडली. लेग स्पिनर स्वेपसनच्या चेंडूवर गिलक्स आक्रमक फटका खेळला.

सिडनी: क्रिकेटच्या मैदानात काहीवेळा खेळाडूंबरोबर दुर्घटना घडतात. चेंडू लागून किंवा पळताना अडखळून खेळाडू जखमी होतात. काहीवेळा स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षकही सामन्यादरम्यान जखमी होतात. बिग बॅश लीग 2022-23 च्या 17 व्या सामन्यात असच दृश्य पहायला मिळालं. सिडनीच्या शोग्राऊंड स्टेडियममध्ये हा सामना झाला. सिडनी थंडरचा ओपनर मॅथ्यू गिलक्सच्या एका शॉटमुळे स्टेडियममध्ये बसलेला एक प्रेक्षक थोडक्यात वाचला. गिलक्सने लांबलचक सिक्स मारला. चेंडू थेट चाहत्याच्या चेहऱ्यावर लागला.
कितीव्या ओव्हरमध्ये घडली दुर्घटना?
सिडनी थंडरच्या डावात 11 व्या ओव्हरमध्ये ही दुर्घटना घडली. लेग स्पिनर स्वेपसनच्या चेंडूवर गिलक्स आक्रमक फटका खेळला. या ओव्हरमध्ये गिलक्सने तीन सिक्स मारले. दुसरा सिक्स चाहत्याच्या चेहऱ्यावर लागला. सुदैवाने थोडक्यात त्याचा डोळा वाचला.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
स्वेपसनच्या चौथ्या चेंडूवर गिलक्सने लॉन्ग ऑनच्यावरुन शॉट मारला. चेंडू प्रेक्षक स्टँडमध्ये गेला. एका चाहत्याने तो चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. पण अंदाज चुकला व चेंडू चेहऱ्यावर लागला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय. गिलक्सने या शॉटबरोबर आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने अवघ्या 31 चेंडूत हाफ सेंच्युरी झळकवली.
हेल्स, गिलक्सने मिळवून दिला विजय
सिडनी थंडरने हा सामना 10 विकेटनी जिंकला. ब्रिस्बेन हीटने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 121 धावा केल्या. प्रत्युत्तरात सिडनीने अवघ्या 11.4 ओव्हर्समध्ये विजयी लक्ष्य गाठलं. सिडनी थंडर एकही विकेट न गमावता हे लक्ष्य गाठलं. गिलक्सने नाबाद 56 आणि एलेक्स हेल्सने नाबाद 59 धावा केल्या. त्यांनी आपल्या टीमला 10 विकेटने मोठा विजय मिळवून दिला.