AUS vs ENG, Ashes 3rd Test, Day 1: ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडची शरणागती

पहिल्या सत्राच्या खेळावर ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व दिसून आलं. कर्णधार पॅट कमिन्सने आपल्या धारदार गोलंदाजीने इंग्लंडला सुरुवातीपासूनच धक्के दिले.

AUS vs ENG, Ashes 3rd Test, Day 1: ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडची शरणागती
| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 10:40 AM

मेलबर्न: अ‍ॅशेस मालिकेत (Ashes series) ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. मेलबर्नमध्ये तिसरा कसोटी सामना सुरु आहे. आज कसोटीचा पहिला दिवस असून ऑस्ट्रेलियाने इंग्लंडची (Australia vs England) कोंडी केली आहे. खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांना मिळणारी मदत लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केले. पहिल्या सत्राच्या खेळावर ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व दिसून आलं. कर्णधार पॅट कमिन्सने आपल्या धारदार गोलंदाजीने इंग्लंडला सुरुवातीपासूनच धक्के दिले.

कमिन्सने इंग्लंडचा सलामीवर हासीब हमीदला भोपळाही फोडू दिला नाही. हमीदला त्याने कारेकरवी झेलबाद केले. झॅक क्रॉले (12), डेविड मलान (14) स्वस्तात बाद झाले. दोघांना कमिन्सने बाद केले. पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने तीन विकेट घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या सत्रात भेदक मार करत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या तीन विकेट काढल्या. अपवाद फक्त कर्णधार जो रुटचा. रुटच्या अर्धशतकाच्या बळावर इंग्लंडची शतकाची वेस ओलांडता आली.

50 धावांवर रुटला स्टार्कने कारेकरवी झेलबाद केले. बटलर अवघ्या (3) धावा काढून तंबूत परतला. स्टोक्स (२५) धावांवर बाद झाला. कमिन्सने तीन, स्टार्क, ग्रीन आणि लेयॉनने प्रत्येकी एक विकेट घेतला आहे. सध्या ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीमध्ये असून इंग्लंडचा संघर्ष सुरु आहे. ही कसोटी जिंकल्यास ऑस्ट्रेलियाला मालिका विजयाची संधी आहे. ऑस्ट्रेलियाने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. अ‍ॅडलेड ओव्हलच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या डे-नाईट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर तब्बल 275 धावांनी विजय मिळवला होता.

संंबंधित बातम्या:

एकनाथ खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडले; शिवसेना आमदाराचा हल्लाबोल
राज्यातल्या पहिल्या बैलगाडा शर्यतीप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेच्या माजी आमदारावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल
Gopichand Padalkar : जयंत पाटील, सांगलीचे SP माझ्या हत्येच्या कटात सामील, गोपीचंद पडळकरांचा आरोप