Mumbai Indians | मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लॉन्च, जाणून घ्या पहिला सामना केव्हा?

मुंबई इंडियन्स टीमने ट्विटर हँडलवरुन मोठी घोषणा केली आहे. टीमने आगामी आयपीएल स्पर्धेसाठी टीमची नवी जर्सी लॉन्च केली आहे.

Mumbai Indians | मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लॉन्च, जाणून घ्या पहिला सामना केव्हा?
| Updated on: Feb 25, 2023 | 9:11 PM

मुंबई | क्रिकेट विश्वातून महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्स टीमने ट्विटर हँडलवरुन मोठी घोषणा केली आहे. टीमने आगामी आयपीएल स्पर्धेसाठी टीमची नवी जर्सी लॉन्च केली आहे. मुंबई इंडियन्स गुजरात जायट्ंस विरुद्ध भिडणार आहे. मुंबईचा हा या मोसमातील पहिला सामना असणार आहे. या सामन्याचं आयोजन हे 4 मार्चला करण्यात आलं आहे. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामातील सलामीचा सामना हा मुंबई विरुद्ध गुजरात यांच्यात होणार आहे. मेन्स आयपीएलच्या पार्श्वभूमीवर महिला आयपीएल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडिन्यसने महिला प्रीमियर लीगमध्येही आपली टीम उतरवली आहे. या महिला टीमची जर्सीची पहिली झलक समोर आली आहे.

मुंबई इंडियन्सने ट्विट करत जर्सीबाबतची माहिती दिली आहे.या जर्सीचा रंग मेन्स टीमच्या जर्सीप्रमाणे आहे, फक्त फरक आहे तो प्रायोजकांचा. ही जर्सी साधारण फिकट निळ्या रंगाची आहे. तर मेन्स टीमची जर्सी ही गडद निळ्या रंगाची आहे.

मुंबई इंडियन्सची जर्सी

हरमनप्रीत कौर हीच्याकडे कॅप्टन्सी

बीसीसीआयकडून या पहिल्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. या मोसमातील सर्व सामन्यांचं आयोजन हे मुंबईतील बेबॉर्न आणि नवी मुंबईतील डीवीय पाटील स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. पहिल्या मोसमात एकूण 5 संघ सहभागी होणार आहेत.

मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिट्ल्स अशा 5 टीम्स ट्रॉफीसाठी भिडणार आहे. मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सीची जबाबदारी स्मृती मंधाना हीच्याकडे आहे.

मुंबई इंडियन्स टीम | हरमनप्रीत कौर (कॅप्टन) नेट सीवर, एमिलिया कर, पूजा वस्‍त्राकर, यास्तिका भाटिया, हीथर ग्राहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, दारा गुजराल, साईका इशाक, हेली मैथ्‍यूज, क्‍लोए ट्रायोन, हुमाएरा काजी, प्रियंका बाला, सोनम यादव, नीलम बिश्‍ट आणि जिंतामनी कलिटा.