MI vs DC WPL : चित्यासारखी चपळ जेमिमाह! सूर मारत घेतला अप्रतिम झेल Video व्हायरल

जेमिमाह रॉड्रिग्सने उजव्या बाजूला सूप मारत तिने उत्कृष्ट झेल पकडला. जेमिमाहचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

MI vs DC WPL : चित्यासारखी चपळ जेमिमाह! सूर मारत घेतला अप्रतिम झेल Video व्हायरल
| Updated on: Mar 20, 2023 | 9:37 PM

मुंबई : वूमन्स प्रीमिअर लीगमधील मुंबई इंडिअन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई संघाने निर्धारित 20 षटकात 109 धावा केल्या. मुंबईकडून पूजा वस्त्राकरने सर्वाधिक 26 धावा तर कर्णधार हरमनप्रीत कौर 23 धावा आणि इस्सी वोंगच्या 23 धावांच्या जोरावर मुंबईला शंभरी पार करत आली. मुंबईच्या मुख्य बॅटर आज अपयशी ठरल्या. या सामन्यात दिल्लीच्या जेमिमाह रॉड्रिग्सने अप्रतिम झेल घेतला.

दिल्लीची शिखा पांडे चौथी ओव्हर टाकत होती. या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर मुंबईच्या हेली मॅथ्यूजने पॉइंट एरियापासून मिड-ऑनच्या दिशेने चौकार मारण्याच्या प्रयत्नात मोठा फटका खेळला. मात्र चपळपणे जेमिमाह रॉड्रिग्सने उजव्या बाजूला सूप मारत तिने उत्कृष्ट झेल पकडला. जेमिमाहचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

 

दिल्लीकडून मारिजाने काप, शिखा पांडे आणि जेस जोनासेन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. दिल्लीला हा सामना जिंकण्यासाठी लक्ष्य पूर्ण करायचं आहे. तर मुंबई सहजासहज हार मानणार नाही. त्यामुळे सामना अतिशय अटीतटीचा होऊ शकतो.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, इस्सी वोंग, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमनी कलिता आणि सायका इशाक.

दिल्ली कॅपिट्ल्स | मेग लॅनिंग (कॅप्टन), शफाली वर्मा, अॅलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, तानिया भाटिया (विकेटकीपर), जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे आणि पूनम यादव.