
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 25 व्या सामन्यात आज 11 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु असा सामना होणार आहे. हा सामना मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला संध्याकाळी साडे सात वाजता सुरुवात होणार आहे. हार्दिक पंड्या मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तर फाफ डु प्लेसिस याच्या खांद्यावर आरसीबीचा धुरा असणार आहे. दोन्ही संघांचा हा सामना जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. कारण दोन्ही संघांची स्थिती बिकट आहे.
मुंबईने 4 पैकी 1 सामन्यात विजय मिळवलाय आणि 2 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी आहे. तर आरसीबीने 5 पैकी 1 सामना जिंकलाय. आरसीबी नवव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा या सामन्यात विजयासह ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न असणार आहे. यासाठी दोन्ही कर्णधार प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हनमध्ये लोकल बॉय शम्स मुलानी याला संधी दिली जाऊ शकते. आता शम्ससाठी कुणाचा पत्ता कापला जाणार याकडे मात्र क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
तर दुसऱ्या बाजूला आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसीस ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल याचा पत्ता कट करु शकतो. मॅक्सवेल सुपर फ्लॉप ठरलाय. मॅक्सवेल 2 वेळा झिरोवर आऊट झालाय. मॅक्सवेलच्या एका डावात 28 ही सर्वाधिक धावसंख्या आहे. त्यामुळे कॅप्टन फाफ मॅक्सवेल याच्या जागी विल जॅक्स याचा समावेश करु शकतो.
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने
A mammoth contest takes place tonight in Mumbai 🍿
The Mumbai Indians 💙 take 🔛 Royal Challengers Bengaluru ❤️ at the Wankhede Stadium!
Which team are you rooting for?
⏰ 7:30 PM IST
💻 https://t.co/4n69KTSZN3
📱 Official IPL App#TATAIPL | #MIvRCB pic.twitter.com/7UdvjXiUSd— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2024
मुंबई इंडियन्स संभावित प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेविड, रोमारियो शेफर्ड, मोहम्मद नबी, गेराल्ड कोएत्जी, शम्स मुलानी आणि जसप्रीत बुमराह.
आरसीबी संभावित प्लेईंग ईलेव्हन : फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, विल जैक्स, कैमरून ग्रीन, सुयश प्रभुदेसाई, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रीस टॉपले, मयंक डागर, यश दयाल आणि मोहम्मद सिराज.