
मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या 17 व्या मोसमातील राजस्थान विरुद्धच्या सामन्यात फ्लॉप सुरुवात झाली आहे. राजस्थान कॅप्टन संजू सॅमसन याने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी बोलावलं. मुंबईकडून रोहित शर्मा आणि ईशान किशन ही जोडी ओपनिंगला आली. घरच्या मैदानात खेळत असल्याने रोहितकडून मुंबईच्या चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती. रोहितची वादळी खेळी पाहण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सूक होते. मात्र राजस्थानच्या ट्रेंट बोल्ट याने मुंबईच्या चाहत्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरलं.
ट्रेंट बोल्ट याने मुंबईला सामन्याच्या पहिल्याच ओव्हरमधील पहिल्या 2 बॉलवर सलग 2 झटके दिले. त्यानंतर ट्रेंट मुंबईच्या डावातील तिसरी आणि आपल्या कोट्यातील दुसरी ओव्हर टाकायला आला. ट्रेंटने या ओव्हरमध्येही मुंबईच्या आणखी एका फलंदाजाला झिरोवर आऊट केलं. ट्रेंटने अशाप्रकारे मुंबईच्या 3 फलंदाजांना झिरोवर आऊट केलं. हे तिघेही फलंदाज पहिल्याच बॉलवर आऊट झाले.
ट्रेंटने रोहित शर्मा आणि नमन धीर या दोघांना पहिल्याच बॉलवर आऊट केलं. रोहित आणि नमन धीर दोघेही गोल्डन डक ठरले. रोहित शर्मा पहिल्या बॉलवर आऊट झाल्याने स्टेडियममध्ये एकच शांतता पसरली. त्यानंतर आलेला नमन धीर हा देखील एलबीडब्ल्यू आऊट झाला. तर त्यानंतर ट्रेंटने इमपॅक्ट प्लेअर डेवाल्ड ब्रेव्हीस यालाही आऊट केलं. नांद्रे बर्गर याने डेवाल्डचा कॅच घेतला.
दरम्यान मुंबईचे पहिले 3 फलंदाज झिरोवर आऊट झाल्याने कॅप्टन म्हणून हार्दिक पंड्यावर मोठी खेळी करण्याची जबाबदारी आहे. हार्दिकला गेल्या 2 सामन्यांपासून जोरदार टीका सहन करावी लागली. त्यामुळे आता हार्दिककडे कॅप्टन म्हणून निर्णायक क्षणी स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे. आता हार्दिक अडचणीत मुंबईसाठी कशी कामगिरी करतो, याकडे पलटणचं लक्ष असणार आहे.
www, ट्रेंट बोल्टचा मुंबईला धक्का
Rohit Sharma Golden duck.
Naman Dhir Golden duck.
Dewald Brevis Golden Duck.– ALL 3 WICKETS FOR BOULT. 🤯 pic.twitter.com/48cC79X2im
— Johns. (@CricCrazyJohns) April 1, 2024
मुंबई इंडियन्स प्लेईंग ईलेव्हन : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह आणि क्वेना मफाका.
राजस्थान रॉयल्स प्लेईंग ईलेव्हन : यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर आणि युझवेंद्र चहल.