
आयपीएल 2025 च्या 33 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादवर 4 विकेट्स राखून पराभव केला. हैदराबादने पहिले बॅटिंग करताना 162 धावा केल्या. मुंबईने प्रत्युत्तरात 6 विकेट्स गमावून हे लक्ष्य पूर्ण केलं. विल जॅक्स हा मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. विल जॅक्स याने ऑलराउंड कामगिरी केली. जॅक्सने 36 धावा केल्या. तर त्याआधी होता 3 ओव्हरमध्ये 14 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या. मुंबईने यासह या मोसमातील तिसरा विजय मिळवला. मुंबईचा हा हैदराबादविरुद्धचा आयपीएल इतिहासातील 11 विजय ठरला. तर हैदराबादचा हा या मोसमातील पाचवा पराभव ठरला. मुंबई या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी कायम आहे.
आयपीएल 2025 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान मुंबई इंडियन्सने 6 गडी गमवून 19व्या षटकात पूर्ण केलं. मुंबई इंडियन्सने स्पर्धेतील तिसरा विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीत आहे. तर सनरायझर्स हैदराबादचा पाय खोलात गेला आहे.
सनरायजर्स हैदराबादने मुंबईला चौथा झटका दिला आहे. पॅट कमिन्स याने सेट झालेल्या विल जॅक्स याला झीशान अन्सारी याच्या हाती कॅच आऊट केलं. विल जॅक्स याने 26 बॉलमध्ये 36 रन्स केल्या. त्यामुळे आता मुंबईला 33 बॉलमध्ये 35 धावांची गरज आहे. हैदराबादने मुंबईसमोर 163 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
सनरायजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सला तिसरा झटका दिला आहे. झिशान अन्सारी याने सूर्याला कर्णधार पॅट कमिन्स याच्या हाती कॅच आऊट केलं. सूर्याने 15 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 2 फोरसह 26 रन्स केल्या.
सनरायजर्स हैदराबादने मुंबईला दुसरा झटका दिला आहे. हर्षल पटेल याने रायन रिकेल्टन याला आठव्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर ट्रेव्हिस हेड याच्या हाती कॅच आऊट केलं. रायनने 23 बॉलमध्ये 31 रन्स केल्या.
सनरायजर्स हैदराबादने मुंबईला दुसरा झटका दिला. झीशान अन्नसारी याने रायन रिकेल्टनला आऊट केलं होतं. मात्र विकेटकीपर हेनरिक क्लासेन याचे हात स्टंप्सच्या पुढे होते. त्यामुळे रायनला नॉट आऊट जाहीर करण्यात आलं. अशाप्रकारे हेनरिकची एक चूक साऱ्या टीमसाठी महागात पडली.
क्लासेनची एक चूक
RICKELTON NOT-OUT…!!!!
– Cummins took a brilliant catch but Klassen’s hand was just infront of the stumps.
Great spot by the third umpire 👌 pic.twitter.com/yBWXbmmrJp
— Johns. (@CricCrazyJohns) April 17, 2025
मुंबईने 163 धावांचा पाठलाग करताना पावरप्लेमधील पहिल्या 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 55 रन्स केल्या आहेत. रायन रिकेल्टन-विल जॅक्स ही जोडी नाबाद आहे. तर रोहित शर्मा 16 बॉलमध्ये 26 रन्स करुन आऊट झाला आहे.
मुंबईला पहिला आणि मोठा झटका लागला आहे. इमपॅक्ट प्लेअर म्हणून आलेला रोहित शर्मा आऊट झाला आहे. रोहितला हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स याने ट्रेव्हिस हेड याच्या हाती कॅच आऊट केलं. रोहित शर्माने 16 बॉलमध्ये 3 सिक्ससह 26 रन्स केल्या.
मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. मुंबईकडून रोहित शर्मा (इमपॅक्ट) आणि रायन रिकेल्टन सलामी जोडी मैदानात आली आहे. सनरायजर्स हैदराबादने मुंबईला विजयााठी 163 धावांचं आव्हान दिलं आहे. आता हा सामना कोण जिंकतं? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे.
सनरायजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्ससमोर 163 धावांचं आव्हान ठेवलं आहे. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 162 धावा केल्या. हैदराबादसाठी अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. अभिषेकने 40 तर हेनरिकने 37 धावा केल्या. तर मुंबईकडून विल जॅक्स याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. आता मुंबई 163 धावा करुन या मोसमातील तिसरा विजय मिळवणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
जसप्रीत बुमराह याने हेनरिक क्लासेन याला 37 धावांवर क्लिन बोल्ड केलं आहे. हैदराबादने यासह पाचवी विकेट गमावली आहे. हैदराबादचा स्कोअर 18.1 ओव्हरनंतर 5 आऊट 136 असा आहे.
मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादला चौथा झटका दिला आहे. ट्रेन्ट बोल्ट याने नितीश कुमार रेड्डी याला तिलक वर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. नितीश कुमार रेड्डी याने 19 धावा केल्या.
सनरायझर्स हैदराबादची तगडी बॅटींग लाईनअप असूनही यावेळी एकदम धीमी सुरुवात झाली. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी फलंदाजांना वेसण घातल्याचं दिसलं. 14.3 षटकात हैदराबादने 3 गडी गमवून 103 धावा केल्या. एकाही फलंदाजाने षटकार मारला नाही हे विशेष
मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादला तिसरा आणि मोठा झटका दिला आहे. विल जॅक्स याने ट्रेव्हिस हेड याला मिचेल सँटनर याच्या हाती कॅच आऊट केलं. हेडने 28 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. विल जॅक्सची ही दुसरी विकेट ठरली.
सनरायजर्स हैदराबादचा स्फोटक फलंदाज ट्रेव्हिस हेड भाग्यवान ठरला आहे. हैदराबादच्या डावातील 10 व्या ओव्हरमध्ये हेड हार्दिक पंड्या याच्या बॉलिंगवर कॅच आऊट झाला. मात्र नेमका तोच नो बॉल असल्याने हेडला जीवनदान मिळालं.
विल जॅक्स याने इशान किशनला आऊट करत हैदराबादला दुसरा झटका दिला आहे. विकेटकीपर रायन रिलकेल्टन याने ईशानला 2 धावावंर स्टंपिंग आऊट केलं.
सनरायजर्स हैदराबादला चांगल्या सुरुवातीनंतर अखेर पहिला झटका लागला आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या याने ट्रॅव्हिस हेड-अभिषेक शर्मा ही जोडी फोडली. हार्दिकने अभिषेकला 8 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर राज बावा याच्या हाती कॅच आऊट केलं. अभिषेकने 28 बॉलमध्ये 40 रन्स केल्या.
ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये बिनबाद 46 धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुंबई विकेट घेण्यात अपयशी ठरली आहे.
मुंबई इंडियन्सने पहिल्याच ओव्हरमध्ये सनरायजर्स हैजराबादच्या सलामी जोडीला जीवनदान दिलं आहे. मुंबईने अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिल हेडला आऊट करण्याची संधी गमावली आहे. त्यामुळे हेड आणि शर्माला जीवनदान मिळालं आहे. विल जॅक्स याने दीपक चाहरने टाकलेल्या डावातील पहिल्याच बॉलवर स्लीपमध्ये अभिषेक शर्माचा कॅच सोडला. तर त्यानंतर चौथ्या बॉलवर हेडने मारलेला फटका थेट कर्ण शर्मा याच्यासमोर पडला. कर्ण शर्माने हा कॅच घेतला असता तर हेड आऊट झाला असता. अशापक्रारे मुंबईने पहिल्याच ओव्हरमध्ये हैदराबादला 2 झटके देण्याची संधी गमावली
मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्याला सुरुवात झाली आहे. हैदराबाद टॉस गमावून बॅटिंगसाठी आली आहे. हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
सनरायजर्स हैदराबादच्या इमपॅक्ट प्लेअर्समध्ये अभिनव मनोहर, जयदेव उनादकट, सचिन बेबी, राहुल चाहर आणि वियान मुल्डर यांचा समावेश आहे. या 5 जणांपैकी कोणत्या खेळाडूला संधी मिळणार आणि तो किती प्रभाव सोडणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
मुंबईच्या इमपॅक्ट प्लेअर्समध्ये रोहित शर्मा, कॉर्बिन बॉश, अश्वनी कुमार, राज बावा आणि रॉबिन मिंझ या 5 जणांचा समावेश आहे. रोहित शर्मा यालाच इमपॅक्ट प्लेअर म्हणून संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि कर्ण शर्मा.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कॅप्टन), हर्षल पटेल, झीशान अन्सारी, मोहम्मद शमी आणि एशान मलिंगा.
मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदारबाद विरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकला आहे. कर्णधार हार्दिक पंड्या याने वानखेडे स्टेडियममध्ये फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मुंबईचे गोलंदाज हैदराबादला किती धावांवर रोखणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे. टॉस कोण जिंकणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत एकूण 23 सामने खेळवण्यात आले आहेत. हैदराबादने त्यापैकी 13 तर मुंबईने 10 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आकडेवारीनुसार, हैदराबाद मुंबईवर वरचढ असल्याचं स्पष्ट होतं.
सनरायझर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अभिनव मनोहर, सचिन बेबी, हर्षल पटेल, ॲडम झम्पा, मोहम्मद शमी, राहुल चहर, जयदेव उनाडकट, कमिंदू मेंडिस, झीशान अन्सारी, वियान मुल्डर, अथर्व तायडे, सिमरन सिंह, एशान मलिंगा आणि अनिकेत वर्मा.
मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रॉबिन मिन्झ, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर, राज बावा, अश्वनी कुमार, कॉर्बिन बॉश, कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराह, रीस टोपले, मुजीब उर रहमान, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर आणि कृष्णन श्रीजीथ.
इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामातील 33 वा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.