IND vs ENG: मोईन अलीने घेतल्या 9 विकेट्स, भारतावर पराभवाची नामुष्की, इंग्लंडच्या ‘त्या’ विजयाची पुनरावृत्ती?

| Updated on: Sep 02, 2021 | 12:20 PM

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यापूर्वी एका आजच्याच दिवशी झालेल्या भारताच्या पराभवाबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण आजची मैदानाची स्थिती पाहता याची पुनरावृत्ती होऊ शकते.

IND vs ENG: मोईन अलीने घेतल्या 9 विकेट्स, भारतावर पराभवाची नामुष्की, इंग्लंडच्या त्या विजयाची पुनरावृत्ती?
इंग्लंड क्रिकेट संघ
Follow us on

लंडन : भारताकडे अनेक दिग्गज फिरकीपटू पूर्वीपासून आहेत. त्यामुळे भारतीय फलंदाजाना फिरकीचा सामना करणं सोपं आहे, असं म्हटलं जात. पण आता अशी परिस्थिती नाही. जागतिक क्रिकेटमधील काही फिरकीपटू भारतीय संघाला (Indian Cricket Team) त्यांच्या फिरकीत गुंडाळण्यात चांगलेच यशस्वी झाले आहेत. असाच गोल गोलंदाज म्हणजे मोईन अली (Moeen Ali).

सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत मोईन दिलासादायक कामगिरी करत आहे. पण 2018 मध्ये त्याने अशी काही कामगिरी केली होती की, भारतीय फलंदाजानी त्याच्या समोर गुडघे टेकले.  2018 च्या साउदम्प्टन कसोटीमध्ये मोईनने 9 विकेट घेत भारताला 60 धावांनी पराभूत करण्यात यश मोठा वाटा उचलला होता. आज या सामन्यांना तीन वर्ष झाली असून 2 सप्टेंबर रोजीच या सामन्याचा निकाल समोर आला होता.

असा झाला होता सामना

पाच कसोटी सामन्याच्या मालिकेतील चौथ्या कसोटीत इंग्लंडने प्रथम फलंदाजी घेतली. भारतीय गोलंदाजीच्या माऱ्यापुढे इंग्लंडने 86 धावांवर सहा विकेट गमावले. पण आठव्या क्रमांकावरील फलंदाज सॅम करनने शानदार अर्धशतक झळकावत संघाला 246 धावांपर्यंत पोहचवलं. मोईनने देखील 40 धावा केल्या. त्यानंतर भारताने चेतेश्वर पुजाराच्या शतकाच्या जोरावर 273 धावा बनवत 27 धावांची आघाडी घेतली. त्या डावात मोईनने पाच विकेट्स घेतल्या. ज्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात  जॉस बटलर (69), जो रूट (48) आणि सॅम करन (46) यांच्या मदतीने  271 धावा करत भारताला 245 धावांच लक्ष्य दिलं. ज्याचा पाठलाग करताना अवघ्या 61 धावांमध्ये भारताचे  7 विकेट पडले.  विराट कोहली (58) आणि अजिंक्य रहाणे (51) यांच्या अर्धशतकाने भारताचा डाव काहीसा सावरला. पण अलीने एका मागोमाग एक विकेट घेत भारताचा डाव आटोपला. 184 धावांवर भारत सर्वबाद झाला आणि  60 धावांनी सामना इंग्लंडने जिंकला. अलीने या डावात 4 विकेट घेत संपूर्ण सामन्यात 9 विकेट्स घेतल्या.

सामन्याची पुनरावृत्ती?

आजपासून (2 सप्टेंबर) भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथी कसोटी सुरु होणार आहे. ओवलच्या मैदानावर सुरु होणाऱ्या या सामन्यासाठी मोईन अलीला उपकर्णधार घोषित करण्यात आलं आहे. त्यात ओवलची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी दिलादायक असल्याने आजही मोईनने 2018 प्रमाणे कामगिरी केल्यास भारताचा वरील पराभवाची पुनरावृत्ती होण्याची भिती निर्माण झाली आहे.

हे ही वाचा :

ICC Test Rankings: जो रूट फलंदाजीचा नवा बादशाह, जागतिक क्रमवारीत रोहितची ऐतिहासिक भरारी, विराट मात्र पिछाडीवर

IND vs ENG : चौथ्या कसोटी सामन्यात सूर्यकुमारला जागा नाही, माजी क्रिकेटपटूने सांगितले कारण

तिसऱ्या कसोटीत पराभूत होणारी टीम इंडिया ‘युजलेस’; मायकल वॉनचा विराटसेनेवर वार

(Moeen ali took 9 Wickets against india in southampton test 2018 on this day india lost match)