Mohammed Shami : मोहम्मद शमीच्या कमबॅकची तारीख ठरली! या टीम विरुद्ध खेळणार सामना

Mohammed Shami Comeback: मोहम्मद शमी याच्या कमबॅकच्या प्रतिक्षेत असलेल्या क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शमी येत्या काही दिवसात क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे.

Mohammed Shami : मोहम्मद शमीच्या कमबॅकची तारीख ठरली! या टीम विरुद्ध खेळणार सामना
Mohammed Shami team india
Image Credit source: Mohammed Shami X Account
| Updated on: Aug 22, 2024 | 12:25 AM

टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीनंतर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. मोहम्मद शमी हा आगामी रणजी ट्रॉफी स्पर्धेतून कमबॅक करणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मोहम्मद शमी रणजी ट्रॉफी स्पर्धेत बंगालचं प्रतिनिधित्व करणार आहे. मोहम्मद शमी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलनंतर दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. शमीला वर्ल्ड कप दरम्यान दुखापत झाली होती. मात्र शमी दुखापतीसह संपूर्ण वर्ल्ड कप खेळला. मात्र त्यानंतर शमीने दुखापतीतून बरं होण्यासाठी आवश्यक सर्व काही केलं. शमीला त्यासाठी आयपीएल आणि नुक्त्याच झालेल्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेवरही पाणी सोडावं लागलं होतं.

मोहम्मद शमीचं कमबॅक केव्हा?

मोहम्मद शमी क्रिकेटपासून गेली 10 महिने दूर आहे. मात्र आता तो पूर्णपणे सज्ज झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोहम्मद शमी रणजी ट्रॉफी स्पर्धेत 11 ऑक्टोबरला मैदानात उतरणार आहे. हा सामना उत्तर प्रदेश विरुद्ध असणार आहे. मात्र मोहम्मद शमी याच्यासमोर एक आव्हान असणार आहे. शमीला या सामन्याच्या काही दिवसांआधी आपण पूर्णपणे फिट असल्याचं सिद्ध करावं लागणार आहे. शमीला हे सर्व एनसीएत करावं लागणार आहे. त्यामुळे शमीने हा अडथळा दूर केला की तो मैदानात उतरण्यासाठी तयार असल्याचं समजावं.

टीम इंडिया आता सप्टेंबर 19 पासून बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. शमी या मालिकेतून कमबॅक करेल, अशी आशा याआधी व्यक्त करण्यात येत होती. मात्र त्यानंतर बीसीसीआयनेच शमी या मालिकेत खेळण्यासाठी पूर्णपणे फिट नसल्याचं जाहीर केलं. तसंच स्वत: शमीनेही आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करण्याआधी डोमेस्टिक मॅच खेळणार असल्याचं सांगितलं होतं.

शमी कमबॅकसाठी सज्ज

टीम इंडिया या वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. शमी या मालिकेपर्यंत पूर्णपणे फिट असावा, अशी प्रत्येकाची आशा असणार आहे. टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने फार महत्त्वाची असणार आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या क्रमवारीत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. तसेच टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात सलग तिसऱ्यांदा पराभूत करण्याचा प्रयत्न असणार आहे. यात मोहम्मद शमीची भूमिका निर्णायक असणार आहे.