Video : ‘माझं ऐक, तिथे झेल जाईल’, शुबमन गिलने सिराजला असं सांगितलं आणि मिळाली विकेट

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील दुसरा सामना भारताच्या पारड्यात झुकला आहे. भारताने पाचव्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यानंतर दोन विकेट घेतल्या आणि विजयापासून पाच पावलं दूर आहे. असं असताना एका विकेटसाठी शुबमन गिलची खेळी कामी आली.

Video : माझं ऐक, तिथे झेल जाईल, शुबमन गिलने सिराजला असं सांगितलं आणि मिळाली विकेट
Video : 'माझं ऐक, तिथे झेल जाईल', शुबमन गिलने सिराजला असं सांगितलं आणि मिळाली विकेट
Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 06, 2025 | 6:02 PM

भारताने दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 427 धावा करून डाव घोषित केला. पहिल्या डावातील 180 धावांच्या आघाडीसह 607 धावा केल्या आणि विजयासाठी 608 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना भारतासमोर चौथ्या दिवशी झटपट विकेट काढण्याचं आव्हान होतं. कारण भारताची गोलंदाजी इंग्लंडच्या फलंदाजांसमोर हवी तशी चालली नाही. पहिल्या कसोटीत बुमराह वगळता सर्वच गोलंदाज महागडे ठरले होते. पण दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत मोहम्मद सिराजने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या डावात त्याने 6 विकेट काढल्या. तर दुसऱ्या डावात जॅक क्राउलीला बाद केलं. त्याला आपलं खातही खोलता आलं नाही. पण या विकेटआधी मोहम्मद सिराज कर्णधार शुबमन गिलकडे फिल्डिंग बदलण्याची मागणी करत होता. पण शुबमन गिलने त्याला तसं करण्यास नकार दिला. तसेच विकेट मिळाल्याने त्याचा निर्णय योग्य ठरला.

मोहम्मद सिराजने सांगितलं की, मी तिकडंच सांगत आहे की तिकडेही आहे. यावर शुबमन गिलने सांगितलं की, माझं ऐक. तिथे झेल जाईल. मागेही तो तिथेच आऊट झाला आहे. ही तशी विकेट नाही. लीड्सवाली विकेट नाही. नॉर्मल चेंडू टाक. हा संवाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर मोहम्मद सिराजला तिथे विकेट मिळाली. मोहम्मद सिराजने जॅक क्राउलीला ऑफ स्टंपच्या जवळ आउटस्विंग चेंडू टाकला. क्राउलीने हा चेंडूवर ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न केला पण फसला. चेंडू बॅटच्या किनाऱ्याला लागून थेट साई सुदर्शनच्या हाती गेला. त्याने कोणतीही चूक न करता झेल पकडला. यासह क्राउली खातं न खोलताच बाद झाला.

पाचव्या दिवसाचं पहिलं सत्र पावसामुळे वाया गेलं. त्यामुळे सामना उशिराने सुरु झाला. त्यामुळे हा सामना 80 षटकांचा होऊ शकतो. सामना सुरु झाल्यानंतर आकाश दीपने इंग्लंडला दोन धक्के दिले. त्यामुळे इंग्लंडची स्थिती आता सामना वाचवण्याची आहे. तर भारतीय संघ विजयापासून अजूनही पाच विकेट दूर आहे. आता भारतीय गोलंदाज पुढे कशी कामगिरी करतात याकडे लक्ष लागून आहे. दुसरीकडे, इंग्लंड हा सामना ड्रॉ करण्याच्या प्रयत्नात आहे. कारण 5 विकेट हातात असताना 500 धावा करणं खूपच कठीण आहे.