IND VS BAN: लिट्टन दास Mohammed siraj ला नडायला गेला आणि… पहा VIDEO

IND VS BAN: दोघांच्या भांडणात विराट कोहलीने सुद्धा लिट्टन दासची मजा घेतली.

IND VS BAN: लिट्टन दास Mohammed siraj ला नडायला गेला आणि... पहा VIDEO
Mohammed Siraj
Image Credit source: Screengrab
| Updated on: Dec 15, 2022 | 5:24 PM

चटोग्राम: भारत आणि बांग्लादेशमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यात आज दोन्ही टीमच्या खेळाडूंमध्ये वाद झाला. मोहम्मद सिराज आणि लिट्टन दासमध्ये हा वाद झाला. यात नुकसान लिट्टन दासच झालं. संघाला गरज असताना, तो अवघ्या 24 रन्सवर बोल्ड झाला. लिट्टन दास आऊट झाल्यानंतर विराट कोहली आक्रमक सेलिब्रेशन करताना दिसला. त्याने बांग्लादेशी प्रेक्षकांकडे इशारा केला. त्यानंतर टेस्ट मॅचच वातावरण आणखीं इंटरेस्टिंग बनलं.

कुठल्या ओव्हरमध्ये झाला शाब्दीक वाद?

सिराज आणि लिट्टन दास यांच्यात शाब्दीक वाद 14 व्या ओव्हरमध्ये पहायला मिळाला. लिट्टन दासने सिराजच्या गोलंदाजीवर काही चांगले शॉट्स मारले. त्यामुळे लक्ष विचलित करण्यासाठी सिराज लिट्टनला उद्देशून काहीतरी बोलला. त्यानंतर मैदानातील वातावरण तापलं. अंपायरने लिट्टन दासला रोखलं. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर सिराजने लिट्टन दासचा खेळ संपवला.

विराटने लगेच कानाला हात लावला

मोहम्मद सिराजने दुसऱ्याच चेंडूवर लिट्टन दासला जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्याने लिट्टनला एक इन-कटर फेकला. जो चेंडू लिट्टनला खेळता आला नाही. चेंडू खाली राहिला. लिट्टनचे थेट स्टम्पस उडवले. लिट्टन बाद होताच सिराजने तोंडावर बोट ठेवून शांत रहाण्याचा इशारा केला. त्याचवेळी स्लीपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीने कानाला हात लावून बांग्लादेशी फॅन्सना इशारा केला.

सिराजची कमालीची गोलंदाजी

चट्टोग्रामची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अनुकूल आहे. पण मोहम्मद सिराजने या विकेटवर कमालीची गोलंदाजी केली. सिराजने लिट्टन दासच्या आधी नजमुल शांटो आणि जाकिर हसनला आऊट केलं. दुसऱ्यादिवस अखेर बांग्लादेशची स्थिती 8 बाद 133 आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने सर्वाधिक 4 आणि सिराजने 3 विकेट काढल्या आहेत.