IPL 2021 : चेन्नई सुपरकिंग्सची कामगिरी उत्तम, पण कर्णधार धोनीच्या नावे खराब रेकॉर्ड

| Updated on: Oct 05, 2021 | 12:09 AM

मागील वर्षीच्या आयपीएलमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स संघाने यंदा मात्र अप्रतिम कामगिरी केली आहे. प्लेऑफमध्ये पोहोचणीरा चेन्नई पहिला संघ आहे.

1 / 5
महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) कर्णधार असलेली चेन्नई सुपरकिंग्स यंदा आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी करत आहे. प्लेऑफमध्ये सर्वात आधी स्थान मिळवलेल्या चेन्नईचा कर्णधार धोनी मात्र यंदा फलंदाजीमध्ये FAIL होत आहे. त्याने एक खराब  रेकॉर्डही स्वत:च्या नावावर केला आहे.

2 / 5
आयपीएल 2021 मध्ये आतापर्यंच 13 सामन्यात धोनीने केवळ 83 धावा केल्या आहेत. 18 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने केवळ 98.80 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या सर्व आयपीएलच्या इतिहासात हा धोनीचा सर्वात खराब स्ट्राईक रेट आहे.

3 / 5
नुकत्याच झालेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात धोनीने केवळ 66.66 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. हा त्याचा आतापर्यंतचा सर्वात कमी स्ट्राईक रेट होता. त्याने या सामन्यात 27 चेंडूत 18 धावा केल्या. धोनी 46 मिनिटं क्रिजवर होता. अखेर आवेश खानच्या चेंडूवर यष्टीरक्षक पंतने धोनीचा झेल घेतला.

4 / 5
आयपीएलच्या इतिहासात 2013 चा सीजन धोनीसाठी बेस्ट होता. त्याने त्यावेळी 162.89 च्या स्ट्राइक रेटने  461 धावा केल्या होत्या.  18 सामन्यात त्याने ही कामगिरी केली असून नाबाद 67 हा त्याचा बेस्ट स्कोर होता.

5 / 5
मागील वर्षी धोनीचा स्ट्राइक रेट 116.27 होता. त्याने 14 सामन्यात 200 धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये धोनीने एकूण 217 सामन्यात 4 हजार 715 धावा केल्या आहेत.  नाबाद 84 त्याचा बेस्ट स्कोर आहे. त्याचा ओवरऑल स्ट्राइक रेट 135.83 इतका आहे.