MS Dhoni Retirement : धोनीच्या निवृत्तीने पाकिस्तानी चाहता झाला भावूक म्हणाला, थाला आमच्यासाठी…
पाकिस्तानच्या एका क्रिकेट चाहत्याने धोनीवरच्या प्रेमाखातर, त्याच्या रिटारयमेंटचा सोहळा केला आहे. धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर चाहता भावूक झाला. धोनीवरच्या त्याच्या प्रेमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगला की दोन्ही देशातील चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचतो. पण एखाद्या खेळाडूचं कौशल्य आणि त्याची लोकप्रियता देशांच्या सीमा ओलांडून जाते. याचे उत्तम उदाहरणं पुन्हा एकदा पाहायला मिळाले. महेंद्रसिंह धोनीनं IPL मधील खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय चाहते भावुक झाले. पण पाकिस्तानाशी संबंध असलेला एका चाहत्यानेही माहीच्या निवृत्तीचे सेलेब्रेशन केले आहे. त्यांना धोनीच्या फोटोचा खास केक तयार करून तो कापला, त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
याच्या चाहत्याचं नाव अरशद मोहम्मद हनीफ असा आहे. तो पाकिस्तानी वंशाचा असून सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये म्हणजेच यूएई राहतो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर भारतीय आणि पाकिस्तानी क्रिकेटपटूशी संबंधित अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात धोनीच्या IPL प्रवासाला पूर्णविराम मिळाल्याच्या बातमीनंतर त्यांने हा खास व्हिडिओ शेअर केला
माहीच्या फोटोचा खास केक या व्हिडिओमध्ये दिसतो आहे. एका टेबलवर धोनीच्या छायाचित्रांनी सजवलेला केक आहे. त्यावर धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या पिवळ्या जर्सीमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे अरशदने या सेलिब्रेशन दरम्यान बाबर आझम फोटो असलेला टी-शर्ट घातला आहे. त्याच्या आजूबाजूला पाकिस्तान क्रिकेट संघाची जर्सी घातलेली काही मुलंही दिसतात दोन्हीसाठी तयार केलेला हा केक कापताना अरशद आपला आनंद आणि भावना व्यक्त करताना दिसतो
थाला आमच्यासाठी भावना आहे असं या व्हिडिओला अरशदने लिहिलेलं कॅप्शनही लक्ष वेधून घेत आहे. त्याने धोनीला उद्देशून म्हटल आहे की धोनीला निरोप कसा देणार, थाला हे केवळ एक नाव नाही, तर आपल्या सगळ्यांच्या भावना आहेत माही तुम्ही कायम आमच्या हृदयात राहाल, नो गुड बाय थाला लिजेंट्स कधीच निरोप घेत नाहीत. अशा शब्दात दोन्ही बद्दलचे प्रेम व्यक्त केलं
2008 पासून सुरू झालेला धोनीचा आयपीएल प्रवास
दरम्यान महेंद्रसिंह धोनीने 17 नोव्हेंबर 2026 रोजी IPL मधील खेळाडू म्हणून निवृत्तीची घोषणा केली. चेन्नई सुपर किंग्स नेही त्याच्यापुढील भूमिकेबाबत माहिती दिली असून 2017 च्या आयपीएल मध्ये तो संघाचा मार्गदर्शक म्हणून काम करणार आहे. 2008 मध्ये सुरू झालेला त्याचा IPL मधील खेळाडू म्हणून प्रवास आता नव्या टप्प्यावर पोहोचला आहे.
धोनीच्या निवृत्तीची बातमी समजल्यानंतर जगभरातील चाहत्यांनी त्याच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या अरशदचा हा व्हिडिओ ही त्याच प्रेमाचं उदाहरण आहे. मैदानावर भारत पाकिस्तानची कसोटीची लढत असली तरी एखादी एखाद्या खेळाडूच्या खेळासाठी असलेला आदर सीमांच्या पलीकडे जातो या व्हिडिओतून पुन्हा दिसून आले.