Cricket : तिसऱ्या सामन्याआधी मुंबईकर खेळाडू संतापला, ट्विट करत सुनावलं

Cricket : गेल्या सामन्यात शतक करुन टीमसाठी निर्णायक भूमिका बजावणाऱ्या मुंबईकर खेळाडूने सोशल मीडियावरुन नाराजी व्यक्त केली आहे. जाणून घ्या नक्की काय प्रकरण आहे?

Cricket : तिसऱ्या सामन्याआधी मुंबईकर खेळाडू संतापला, ट्विट करत सुनावलं
sarfaraz shreyas yashasvi ashwin k s bharat team india
Image Credit source: shreyas iyer X Account
| Updated on: Oct 23, 2024 | 8:57 PM

टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना 24 ऑक्टोबरपासून खेळणार आहे. टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा दुसरा सामना अटीतटीचा आहे. त्यामुळे टीम इंडिया या सामन्यात मालिकेत बरोबरी करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रतिष्ठेच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेचा थरार सुरु आहे. गतविजेत्या मुंबई टीमची या स्पर्धेत पराभवाने सुरुवात झाली. बडोदाने मुंबईला 2 दशकानंतर पराभूत केलं. मात्र त्यानंतर मुंबईने दुसऱ्या सामन्यात कमबॅक करत महाराष्ट्र टीमवर विजय मिळवला. मुंबई आता तिसरा सामना हा त्रिपुरा विरुद्ध खेळणार आहे. मात्र तिसऱ्या सामन्याआधी मुंबईकर फलंदाजाने सोशल मीडियावरुन पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.

मुंबई विरुद्ध त्रिपुरा यांच्यातील सामना हा 26 ऑक्टोबरपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी मुंबईचा अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यर याने ‘एक्स’ या सोशल मीडियावरुन पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रेयस अय्यरला दुखापतीमुळे त्रिपुरा विरूद्धच्या सामन्याला मुकावं लागणार असल्याचा दावा करण्यात आला होता. श्रेयसने यावरुन नाराजी व्यक्त करत चांगलंच सुनावलं आहे.

श्रेयसने एक्स पोस्टमध्ये काय म्हटलंय?

श्रेयसने दुखापतीच्या बातम्या या निराधार असल्याचं म्हटलंय. तसेच श्रेयसने दुखापतीबाबत वृत्त देणाऱ्यांवर संताप व्यक्त करणारी पोस्ट केलीय. “मित्रांनो बातम्या प्रकाशित करण्यापूर्वी अभ्यास करा”, असं श्रेयसने त्याच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय. मीडिया रिपोर्ट्नुसार, श्रेयसला खांद्याच्या दुखापतीमुळे त्रिपुरा विरुद्ध खेळणार नसल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच श्रेयसला दुखापतीमुळे आठवडाभर विश्रांतीचा सल्ला देण्यात आल्याचं म्हटलं होतं. मात्र हे सर्वकाही बोगस असल्याचं श्रेयसच्या सोशल मीडिया पोस्टनंतर स्पष्ट झालं आहे.

महाराष्ट्र विरुद्ध शतकी खेळी

दरम्यान श्रेयस अय्यर गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियापासून दूर आहे. तसेच श्रेयसला देशांतर्गत क्रिकेटमध्येही लौककाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मात्र श्रेयसला महाराष्ट्र विरूद्धच्या सामन्यात सूर गवसला. श्रेयसने महाराष्ट्र विरुद्ध 190 चेंडूत 142 धावांची खेळी केली. त्यामुळे श्रेयसकडून त्रिपुरा विरुद्धही अशीच कामगिरी अपेक्षित असणार आहे.

श्रेयसची एक्स पोस्ट

त्रिपुरा विरूद्धच्या सामन्यासाठी मुंबई टीम : अजिंक्य रहाणे (कप्तान), आयुष म्हात्रे, अंगीकृष रघुवंशी, अखिल हेरवाडकर, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, हार्दिक तमोरे, सिद्धांत अद्धतराव, शम्स मुलानी, कर्ष कोठारी, हिमांशु सिंह, शार्दुल ठाकुर, मोहित अवस्थी, जुनेद खान आणि रॉयस्टन डायस.