रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने का बनवलं पुन्हा कॅप्टन, 3 कारणं कोणती?

आयपीएल 2027 साठी मुंबई इंडियन्सने पुन्हा रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवलं आहे. हार्दिक पंड्याच्या जागी रोहितची निवड करण्यामागे नेमकी कोणती कारणं आहेत? पाच वेळा विजेतेपद मिळवून देणारा अनुभव, संघाची कामगिरी आणि चाहत्यांचा विश्वास या तीन गोष्टी महत्त्वाच्या ठरल्याचं दिसत आहे.

रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने का बनवलं पुन्हा कॅप्टन, 3 कारणं कोणती?
Rohit Sharma Mumbai Indians New Captain
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 27, 2026 | 9:13 PM

Rohit Sharma Mumbai Indians New Captain : आयपीएल 2027 साठी मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा रोहित शर्माच्या हाती संघाची धुरा सोपवली आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील पर्वानंतर आता मुंबईने आपल्या जुन्या कर्णधारावर विश्वास दाखवला आहे. या निर्णयामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, रोहित शर्मालाच पुन्हा कर्णधार बनवण्यामागे नेमकी तीन महत्त्वाची कारणं कोणती याबद्दल जाणून घेऊयात.

पाच आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्याचा अनुभव

रोहित शर्माला पुन्हा कर्णधार बनवण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्याचा यशस्वी कर्णधारपदाचा अनुभव. 2011 मध्ये रोहित मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला होता. त्यानंतर त्याने आपल्या नेतृत्वाखाली संघाला 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशी एकूण 5 आयपीएल विजेतेपदं मिळवून दिली. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी रोहित केवळ अनुभवी खेळाडू नसून विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार आहे. पाच ट्रॉफी जिंकण्याचा त्याचा अनुभव संघासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

Loading...

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली अपेक्षित यश नाही

2024 मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पंड्याकडे नेतृत्व सोपवलं होतं. मात्र, या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईने तीन हंगाम खेळले. या काळात संघाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नाही. एका हंगामात संघ तळाच्या स्थानावर राहिला, तर दुसऱ्या हंगामात नवव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. केवळ एकदाच संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवता आला. त्यामुळे आता पुन्हा अनुभवी रोहितकडे नेतृत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला असावा.

 

 

 

चाहत्यांचा विश्वास आणि रोहितचं नेतृत्व

रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स यांचं नातं जुनं आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने मोठं यश मिळवलं आहे. कर्णधारपदावरून हटवल्यानंतर चाहत्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे रोहितला पुन्हा नेतृत्व देण्याचा निर्णय चाहत्यांशी असलेलं नातं मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांनीही रोहितच्या नेतृत्वाचं कौतुक केलं आहे. 2011 पासून त्याचा झालेला प्रवास आणि संघाला सर्वाधिक यशस्वी बनवण्यात त्याचं योगदान त्यांनी अधोरेखित केलं आहे.

धोनीचा विक्रम मोडण्याची संधी

रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी या दोघांच्याही नावावर आयपीएलमध्ये प्रत्येकी 5 विजेतेपदं आहेत. आता पुन्हा कर्णधारपद मिळाल्यानंतर रोहितसमोर सहाव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचं आव्हान असेल. मुंबई इंडियन्सला पुन्हा विजेतेपद मिळवून दिल्यास रोहितच्या नावावर आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद होईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us