Mumbai Indians च्या एका मोठ्या माजी खेळाडूचं टि्वटर अकाऊंट हॅक

अकाऊंट हॅक केल्यानंतर सकाळी 7.30 च्या सुमारास पहिलं टि्वट करण्यात आलं. अज्ज्ञात बिटकॉइन स्कॅमरसनी याआधी सुद्धा काही टि्वटर अकाऊंट हॅक केली आहेत.

Mumbai Indians च्या एका मोठ्या माजी खेळाडूचं टि्वटर अकाऊंट हॅक
| Edited By: | Updated on: Jan 27, 2022 | 9:48 AM

मुंबई: हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) भाऊ क्रिकेटपटू क्रृणाल पांड्याचं (Krunal Pandya) टि्वटर अकाऊंट हॅक (Twitter Account Hack) करण्यात आलं आहे. बिटकॉइन स्कॅमर असं टि्वट त्याच्या अकाऊंटवर दिसत आहे. या हॅकरने क्रृणालच्या अकाऊंटवरुन अनेक टि्वटस केली आहेत. ‘बिटकॉइन्ससाठी अकाऊंट विकतोय’ असं सुद्धा त्याने टि्वट केले आहे. अकाऊंट हॅक केल्यानंतर सकाळी 7.30 च्या सुमारास पहिलं टि्वट करण्यात आलं. अज्ज्ञात बिटकॉइन स्कॅमरसनी याआधी सुद्धा काही टि्वटर अकाऊंट हॅक केली आहेत. आता या यादीत क्रृणाल पांड्याचा समावेश झाला आहे.

अशा स्कॅम्ससाठी 100 हायप्रोफाईल टि्वटर अकाऊंट हॅक

2020 मध्ये अशा स्कॅम्ससाठी 100 हायप्रोफाईल टि्वटर अकाऊंट हॅक करण्यात आली होती. क्रृणाला आतापर्यंत भारतासाठी पाच वनडे आणि 19 टी-20 सामने खेळला आहे. यंदाच्यावर्षी स्थानिक संघ बडोद्याकडून तो विजय हजारे करंडक स्पर्धेत खेळला होता. पुढच्या महिन्यात आयपीएलसाठी मेगा ऑक्शन होणार आहे. यामध्ये क्रृणाल पांड्याला चांगली किंमत मिळू शकते.

एकूण 10 संघ यंदाच्या आयपीएलमध्ये आहेत. क्रृणाल पाचवेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई संघाचा भाग होता. पण फ्रेंचायजीने त्याला रिटेने केलेले नाही. त्याचा भाऊ हार्दिकलाही मुंबईने रिटेन केलं नाही. तो आता अहमदाबाद संघाचा कर्णधार आहे. बंगळुरुमध्ये 12 आणि 13 फेब्रुवारीला मेगा ऑक्शन पार पडणार आहे.