Marathi News » Sports » Cricket news » India vs west indies indian team selection deepak hooda ravi bishnoi avesh khan kuldeep yadav axar patel
IND VS WI: ‘या’ पाच खेळाडूंना लागली टीम इंडियाची लॉटरी, राहुल द्रविड-रोहित शर्मा जोडीने दिली संधी
वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या (IND vs WI) वनडे आणि टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माने (Rohit sharma) फिटनेस टेस्ट पास केली असून तो पूर्णवेळ कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करणार आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या (IND vs WI) वनडे आणि टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माने (Rohit sharma) फिटनेस टेस्ट पास केली असून तो पूर्णवेळ कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करणार आहे. निवडसमितीने या दौऱ्यासाठी काही युवा खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. त्यांची चांगली कामगिरी पाहून त्यांना टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे. ज्या पाच खेळाडूंना लॉटरी लागलीय, त्याच्याबद्दल जाणून घेऊया (फोटो सौजन्य - AFP)
1 / 6
राजस्थानचा फलंदाज दीपक हुड्डाला वनडे संघात स्थान मिळालय. मागच्यावर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत या खेळाडूने 73 पेक्षा जास्त सरासरीने 293 धावा केल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीमध्ये या खेळाडूने 33 च्या सरासरीने फक्त 198 धावा केल्या होत्या. (फोटो सौजन्य - टि्वटर)
2 / 6
राजस्थानचा लेग स्पिनर रवी बिश्नोईला पहिल्यांदा टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे. वनडे आणि टी-20 दोन्ही संघात या युवा फिरकी गोलंदाजाला संधी मिळाली आहे. बिश्नोईने आतापर्यंत शानदार प्रदर्शन केलं आहे. आयपीएलमध्ये खेळल्या गेलेल्या 24 सामन्यात त्याने 25 विकेट घेतल्या आहेत. बिश्नोईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत 6 मॅचमध्ये आठ विकेट घेतल्या. विजय हजारे करंडक स्पर्धेत 6 सामन्यात 8 विकेट घेतल्या. (फोटो सौजन्य - टि्वटर)
3 / 6
मध्य प्रदेशचा वेगवान गोलंदाज आवेश खानला सुद्धा टीम इंडियात संधी मिळालीय. आवेश खान मागच्या काही काळापासून टीम इंडियाच्या सेटअपचा भाग आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नेट गोलंदाज म्हणून भारतीय संघासोबत गेला होता. यावेळी आवेशला वनडे आणि टी-20 मध्ये संधी मिळाली आहे. 145 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्याची त्याची क्षमता आहे. (फोटो सौजन्य - टि्वटर)
4 / 6
कुलदीप यादवने सुद्धा वनडे आणि टी -20 संघात पुनरागमन केलं आहे. चायनामन गोलंदाजी करणारा कुलदीप मागच्यावर्षी गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त होता. संघाबाहेर गेलेल्या कुलदीपवर निवड समितीने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. कुलदीपने 65 वनडेमध्ये 107 विकेट घेतल्या आहेत. टी-20 मध्येही कुलदीपने 23 सामन्यात 41 विकेट घेतल्या आहेत. (फोटो सौजन्य - AFP)
5 / 6
ऑलराऊंडर अक्षर पटेलनेही दुखापतीनंतर संघात पुनरागमन केलं आहे. त्याला टी-20 संघात स्थान मिळालं आहे. वनडे मध्ये अक्षरला संधी मिळालेली नाही. अक्षरने भारताकडून पंधरा टी-20 सामन्यात 13 विकेट घेतल्यात. रवींद्र जाडेजाच्या अनुपस्थितीत अक्षरकडे स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी आहे. (फोटो सौजन्य - टि्वटर)