Ranji Trophy: Ajinkya Rahane च्या जागी मिळालेल्या संधीचं मुंबईच्या युवा क्रिकेटपटूने सोनं केलं, डेब्यु मॅच मध्येच सेंच्युरी

| Updated on: Jun 07, 2022 | 1:59 PM

सध्या रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) क्वार्टर फायनलचे सामने सुरु आहेत. मुंबईचा उत्तराखंड विरुद्ध (Mumbai vs Uttrakhand) बेंगळुरुमध्ये सामना सुरु आहे. काल पहिल्या दिवसाच्या अखेरीस मुंबईने चांगली धावसंख्या उभारली.

Ranji Trophy: Ajinkya Rahane च्या जागी मिळालेल्या संधीचं मुंबईच्या युवा क्रिकेटपटूने सोनं केलं, डेब्यु मॅच मध्येच सेंच्युरी
ajinkya rahane
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई: सध्या रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) क्वार्टर फायनलचे सामने सुरु आहेत. मुंबईचा उत्तराखंड विरुद्ध (Mumbai vs Uttrakhand) बेंगळुरुमध्ये सामना सुरु आहे. काल पहिल्या दिवसाच्या अखेरीस मुंबईने चांगली धावसंख्या उभारली. सोमवारी पहिल्यादिवशी स्टंम्पसपर्यंत मुंबईने तीन विकेट गमावून 304 धावा केल्या होत्या. रणजीमध्ये पदार्पण करणाऱ्या एका खेळाडूमुळे मुंबईला तीनशेपार मजल मारता आली. सुवेद पारकर (Suved parker) असं, मुंबईच्या या खेळाडूच नाव आहे. सुवेदला अंतिम प्लेइंग-11 मध्ये संधी मिळाली. त्याने मिळालेल्या संधीच सोनं केलं. त्याने पहिल्याच दिवशी शानदार शतकी खेळी केली. सुवेद पारकर दिवसअखेरीस 104 धावांवर नाबाद होता. पहिल्यादिवशी सुवेदने 218 चेंडूंचा सामना केला व आठ चौकार आणि दोन षटकार लगावले. सुवेज पारकरला साथ दिली ते सर्फराजन खानने. सर्फराज काल 69 धावांवर नाबाद होता. आज त्याने शानदार शतक झळकावलं. सर्फराजने 205 चेंडूत 153 धावा फटकावल्या. यात 14 चौकार आणि चार षटकार होते.

सुवेदने मिळालेल्या संधीचं सोनं केलं

सुवेद पारकरचा हा फर्स्ट क्लासचा पहिला सामना होता. रणजी ट्रॉफीच्या आधी त्याने धावांच्या राशी उभारल्या आहेत. कर्नल सी.के.नायडू ट्रॉफीमध्ये सुवेदने दमदार फलंदाजी केली. त्याने 6 सामन्यात 601 धावा केल्या. 66.78 च्या सरासरीने त्याने धावा केल्या. सामन्याआधी मुंबईची मधलीफळी कमकुवत वाटत होती, कारण संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे दुखापतीमुळे खेळत नाहीय. अजिंक्य रहाणेच्या अनुपस्थितीत मुंबईने सुवेद पारकरला संधी दिली. त्याने मिळालेल्या संधीचा अचूक लाभ उठवला. आज दुसऱ्यादिवशीही त्याचा तसाच खेळ सुरु आहे. त्याने दीड शतकाचा टप्पा ओलांडला आहे.

मुंबईसाठी बनला संकटमोचक

मुंबईचा डाव संकटात असताना सुवेद पारकरने संकट मोचकाची भूमिका बजावली. मुंबईचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले होते. या सामन्यात मुंबईचा कॅप्टन पृथ्वी शॉ ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ 21 धावांवर आऊट झाला. यशस्वी जैस्वाल 35 धावांवर बाद झाला. अरमान जाफर 60 धावांची अर्धशतकी इनिंग खेळला. सुवेद पारकर आणि सर्फराज खानने शतक झळकवून उत्तराखंडला बॅकफूटवर ढकललं.