Asia Cup 2023 : आशिया कप स्पर्धेत लिंबूटिंबू नेपाळ संघ करेल मोठा उलटफेर, जाणून घ्या आतापर्यंतचा रेकॉर्ड

आशिया कप स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. पण लिंबूटिंबू नेपाळ कमी लेखणं चांगलंच महागात पडू शकतं.

Asia Cup 2023 : आशिया कप स्पर्धेत लिंबूटिंबू नेपाळ संघ करेल मोठा उलटफेर, जाणून घ्या आतापर्यंतचा रेकॉर्ड
Asia Cup 2023 : नेपाळ संघाला कमी लेखणं पडू शकतं महागात, आतापर्यंत रेकॉर्ड पाहाल तर बसेल धक्का
| Updated on: Aug 25, 2023 | 10:14 PM

मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धा ही सहा संघांमध्ये असून 30 ऑगस्टला पहिला सामना होणार आहे. आशिया कप स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ हे सहा संघ खेळणार आहेत. भारत, पाकिस्तान आणि नेपाळ एका गटात, तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघ दुसऱ्या गटात आहेत. पहिल्याच सामन्यात पाकिस्तान आणि नेपाळ हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात पाकिस्तानचं पारडं जड असलं तरी नेपाळ सामन्यात मोठा उलटफेर करू शकतं. त्यामुळे नेपाळ संघाला कमी लेखणं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना चांगलंच महागात पडू शकते. कारण नेपाळ संघाने दिग्गज संघांना पराभवाचं पाणी पाजून आशिया कप स्पर्धेत स्थान मिळवलं आहे. नेपाळने युएईसारख्या संघाला पराभूत केलं आहे. नुकतंच युएईने न्यूझीलंडसारख्या दिग्गज संघाला पराभवाची धूळ चारली आहे.

आशिया कप स्पर्धेत स्थान मिळवणाऱ्या नेपाळ संघाने पात्रता फेरीत जबरदस्त कामगिरी केली आहे. अंतिम फेरीत युएईला 7 गडी राखून पराभूत करून आशिया कप 2023 स्पर्धेत स्थान मिळवलं होतं. आता आशिया कप स्पर्धेत 30 ऑगस्टला पाकिस्तान विरुद्ध नेपाळ आणि 4 सप्टेंबरला भारत विरुद्ध नेपाळ सामना होणार आहे.

नेपाळने वनडे क्रिकेटमध्ये 57 सामने खेळले आहेत. यात 30 सामन्यात विजय, तर 25 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. एक सामना अनिर्णित ठरला आणि एका सामन्याचा निकालच लागला नाही. नेपाळ वनडे फॉर्मेटमध्ये सर्वाधिक सामने युएईसोबत खेळला आहे. या दोन्ही संघात आतापर्यंत 15 सामने झाले असून नेपाळे 9 सामने जिंकले आहेत. इतकंच काय तर नेदरलँड आणि स्कॉटलँडही पराभूत केलं आहे.

आशिया कपसाठी नेपाळ टीम | रोहित पौडेल (कॅप्टन), आसिफ शेख, कुशल भुर्टेल, ललित राजबंशी, भीम सार्की, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंह ऐरी, संदीप लामिछाने, करण केसी, गुलशन झा, सोमपाल कामी, आरिफ शेख, प्रतीस जीसी, किशोर महतो, संदीप जोरा, अर्जुन सऊद आणि श्याम ढकाल.