AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20I World Cup 2024 : सीएसकेतील ‘या’ चौघांची निवड, टी 20 वर्ल्ड कपसाठी टीमची घोषणा

T20I World Cup 2024 : निवड समितीने टी 20 वर्ल्ड कपसाठी मुख्य संघात नियमानुसार 15 खेळाडूंचा समावेश केला आहे. तर राखीव खेळाडू म्हणून फक्त 1 खेळाडूचीच निवड केली आहे.

T20I World Cup 2024 : सीएसकेतील 'या' चौघांची निवड, टी 20 वर्ल्ड कपसाठी टीमची घोषणा
chenni super kings huddle talk,Image Credit source: CSK X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 29, 2024 | 3:52 PM
Share

भारतात सध्या आयपीएलच्या 17 व्या मोसमाचा थरार सुरु आहे. एकूण 10 संघांमध्ये प्लेऑफचं तिकीट मिळवण्यासाठी चढाओढ पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे आगामी टी 20 वर्ल्ड कपकडे लागून राहिलं आहे. वर्ल्ड कप स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. तर आयसीसीने सर्व सहभागी संघांना आपली टीमची घोषणा करण्यासाठी 1 मे ही अखेरची तारीख दिली आहे. टीम इंडियामध्ये वर्ल्ड कपसाठी कुणाला संधी मिळणार? अशी चर्चा सुरु असताना दुसऱ्या बाजूला एका संघाने वर्ल्ड कपसाठी आपली टीम जाहीर केली आहे.

न्यूझीलंडने टी 20आय वर्ल्ड कप 2024 साठी संघ जाहीर केला आहे. न्यूझीलंडने सोशल मीडियावरुन पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. न्यूझीलंडने मुख्य संघात एकूण 15 खेळाडूंचा समावेश केला आहे. तर राखीव म्हणून एका खेळाडूला संधी दिली आहे. न्यूझीलंड कोच गॅरी स्टीड यांच्या मार्गदर्शनात खेळणार आहे. तर केन विलियमसन न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे.

न्यूझीलंडमध्ये अनुभवी खेळाडू

न्यूझीलंडच्या टी 20 वर्ल्ड कप संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत. या खेळाडूंना टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचा तगडा अनुभव आहे. केन विलियमसन याचा हा सहावा टी वर्ल्ड कप असणार आहे. तर टीम साऊथीचा हा सातवा वर्ल्ड कप आहे. तर ट्रेन्ट बोल्टची ही पाचवी स्पर्धा असणार आहे. न्यूझीलंडला आतापर्यंत एकदाही टी 20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही.

चेन्नईतील या चौघांची निवड

न्यूझीलंडचे बरेचसे खेळाडू हे सध्या भारतात आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. त्यापैकी चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळणाऱ्या तिघांची न्यूझीलंडकडून वर्ल्ड कपसाठी निवड करण्यात आली आहे. डेव्हॉन कॉनव्हे, डॅरेल मिचेल, मिचेल सँटनर आणि रचीन रवींद्र हे न्यूझीलंडचे खेळाडू आहेत. हे तिघे सध्या आयपीएलच्या 17 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत आहेत. या तिघांना न्यूझीलंडने वर्ल्ड कपसाठी संधी दिली आहे. भारतीय वंशाचा असलेला ऑलराउंर रचीन रवींद्र याने भारतात 2023 साली झालेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यामुळे रचीनकडून या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतही तशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

न्यूझीलंडची टी 20 वर्ल्ड कपसाठी घोषणा

तिघांना डच्चू

तर न्यूझीलंड टीममध्ये टीम सायफर्ट, टॉम लॅथम आणि विल यंग या तिघांना शानदार कामगिरीनंतरही स्थान देण्यात आलेलं नाही. तसेच कॉलिन मुनरो यालाही संधी मिळाली नाही. तर कायले जेमीन्सन आणि एडम मिल्ने या दोघांना दुखापतीमुळे स्थान मिळालं नाही.

टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी न्यूझीलंड टीम : केन विलियमसन (कॅप्टन), फिन एलेन, मार्क चॅपमॅन, मायकल ब्रेसवेल, ट्रेन्ट बोल्ट, डेव्हॉन कॉन्व्हे, लॉकी फर्ग्युसन, टीम साऊथी, रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, मॅट हेनरी, जिमी नीशाम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोढी आणि बेन सियर्स (राखीव)

Follow Us
बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने
Amitabh Bachchan Safety : बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने खळबळ
मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज...
महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक!
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या...
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या नेतृत्वाबाबत काय म्हणाले?
छठपूजेनंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंड...
छठपूजेनंतर महाराष्ट्रात अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंडाच्या पायऱ्यांवर आडनावे, समुद्रकिनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग
रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्ते
Eknath shinde : रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
Jalgaon : जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या...
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याची चिंता
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले...
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले, अपना घर घोटाळ्यावरही मोठा इशारा!
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुनावणीची शक्यता...
Shivsena Hearing Update : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुनावणीची शक्यता
बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन; ठाकरे बंधू एकत्र दिसणार?
Balasaheb Thackeray Smrutidin : बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन; ठाकरे बंधू एकत्र दिसणार?