NZ vs SA : फायनलआधी न्यूझीलंडला झटका, कॅप्टन पाचव्या सामन्यातून आऊट, कुणाला संधी?

New Zealand vs South Africa 5th T20i : न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी 20i मालिका निर्णायक वळणावर आहे. अशात न्यूझीलंडला मोठा झटका लागला आहे. न्यूझीलंडच्या टॉम लॅथम याला अंगठ्याच्या दुखापतीमुळे अंतिम सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे.

NZ vs SA : फायनलआधी न्यूझीलंडला झटका, कॅप्टन पाचव्या सामन्यातून आऊट, कुणाला संधी?
New Zealand Tom Latham
Image Credit source: @BLACKCAPS X Account
| Updated on: Mar 24, 2026 | 7:18 PM

न्यूझीलंड मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळत आहे. उभयसंघातील 5 सामन्यांची मालिका ही 2-2 ने बरोबरीत आहे. त्यामुळे पाचवा आणि अंतिम सामना हा निर्णायक ठरणार आहे. हा सामना बुधवारी 25 मार्च रोजी होणार आहे. मात्र त्याआधी न्यूझीलंडला मोठा झटका लागला आहे. न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज टॉम लॅथम याला दुखापतीमुळे पाचव्या सामन्यालाही मुकावं लागलं आहे. न्यूझीलंड क्रिकेटकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. तसेच टॉमच्या जागी कव्हर खेळाडू म्हणून एकाचा समावेश करण्यात आला आहे. त्याबाबत आपण जाणून घेऊयात.

दुखापतीमुळे टॉम शेवटच्या 2 सामन्यातून आऊट

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी संघ जाहीर करताना 2 खेळाडूंकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. त्यानुसार मिचेल सँटनर याच्याकडे पहिल्या 3 सामन्यांचं नेतृत्व देण्यात आलं. तर उर्वरित आणि शेवटच्या 2 सामन्यांमध्ये टॉम लॅथम हा नेतृत्व करणार असल्याचं निश्चित झालं. सँटनर याच्या नेतृत्वात 3 सामन्यानंतर न्यूझीलंडने मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. त्यानंतर टॉम लॅथम नेतृत्व करणार असल्याचं निश्चित होतं. मात्र टॉमला चौथ्या सामन्याआधी दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं. त्यामुळे टॉमच्या जागी जेम्स निशाम याला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली.

जेम्स निशाम याच्या नेतृत्वात न्यूझीलंडला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे पाचव्या आणि अंतिम सामन्यात टॉमचं कमबॅक होईल आणि तो नेतृत्वाची सूत्र हाती घेईल, अशी आशा चाहत्यांना होती. मात्र क्रिकेट बोर्डाकडून टॉम पाचव्या सामन्यातही खेळता येणार नसल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे टॉमच्या जागी टॉम ब्लंडेल याचा कव्हर म्हणून समावेश करण्यात आला आहे.

टॉम लॅथमला काय झालंय?

टॉमला डाव्या हाताच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे चौथ्या आणि पाचव्याही सामन्याला मुकावं लागलंय. टॉमच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याचं स्पष्ट झालंय. टॉमला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी 20i सामन्यादरम्यान ही दुखापत झाली होती. त्यामुळे टॉमला 3 आठवडे क्रिकेटपासून दूर रहावं लागणार आहे. त्यामुळे जेम्सन निशाम हाच अंतिम सामन्यातही नेतृत्व करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

टॉम लॅथमचा पाचव्या सामन्यातूनही पत्ता कट

टॉम लॅथमची टी 20i कारकीर्द

दरम्यान टॉमने न्यूझीलंडचं 29 टी 20i क्रिकेट सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. टॉमने या 29 सामन्यांमधील 26 डावांत 4 अर्धशतकांसह एकूण 597 धावा केल्या आहेत. तसेच टॉम न्यूझीलंडसाठी 91 कसोटी आणि 163 एकदिवसीय सामने खेळला आहे.

Follow Us