
सिडनी: T20 वर्ल्ड कप 2022 ची पहिली सेमीफायनल सिडनीमध्ये होणार आहे. पहिली सेमीफायनल पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या टीममध्ये होणार आहे. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलियमसनने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. न्यूझीलंडच्या टीमचा ग्रुप राऊंडमध्ये फक्त एक पराभव झालाय. त्यामुळे ते ग्रुप 1 मध्ये टॉपवर आहेत.
पाकिस्तानच्या टीमची सुरुवातीला स्थिती खराब होती. दोन मॅच हरुनही पाकिस्तानची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचलीय.
दोन पैकी कुठली टीम सरस?
दोन पैकी कुठली टीम सरस? हा प्रश्न आहे. आकडे पाहिल्यास पाकिस्तानचा संघ सरस आहे. टी 20 च्या पीचवर दोन्ही टीम्समध्ये आतापर्यंत 28 सामने झाले आहेत. पाकिस्तानने त्यापैकी 17 मॅचमध्ये विजय मिळवलाय. टी 20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पाकिस्तानने न्यूझीलंडला 4 वेळा हरवलय. दोनवेळा पाकिस्तानचा पराभव झालाय.
सेमीफायनलमध्ये कितीवेळा आमने-सामने आल्या
आयसीसी टुर्नामेंट्समध्ये दोन्ही टीम्स 3 वेळा सेमीफायनलमध्ये आमने-सामने आल्या आहेत. प्रत्येकवेळी पाकिस्तानची टीम जिंकली आहे.
पाकिस्तानची प्लेइंग इलेवन- मोहम्मद रिजवान, बाबर आजम, मोहम्मद हारिस, शान मसूद, शादाब खान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम, नसीम शाह, हॅरिस रौफ, शाहीन आफ्रिदी.
न्यूजीलंडची प्लेइंग इलेवन- फिन एलेन, डेवन कॉन्वे, केन विलियमसन, ग्लेन फिलिप्स, डॅरेल मिचेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउदी, इश सोढ़ी, लॉकी फर्गुसन, ट्रेंट बोल्ट