NZ vs SA : न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका पाचव्या आणि अंतिम टी 20I सामन्यासाठी सज्ज, कोण जिंकणार मालिका?

New Zealand vs South Africa 5th T20i : न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 सामन्यांची टी 20i मालिका 2-2 ने बरोबरीत आहे. त्यामुळे मालिका कोण जिंकणार याची उत्सूकता शिगेला पोहचली आहे.

NZ vs SA : न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका पाचव्या आणि अंतिम टी 20I सामन्यासाठी सज्ज, कोण जिंकणार मालिका?
New Zealand vs South Africa T20i
Image Credit source: @BLACKCAPS X Account
| Updated on: Mar 23, 2026 | 11:07 PM

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर उपविजेता न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात व्हाईट बॉल सीरिज खेळवण्यात येत आहे. उभयसंघात एकूण 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येत आहे. मालिकेतील 4 सामने झाले आहेत. मालिका 4 सामन्यानंतर 2-2 ने बरोबरीत आहे. त्यामुळे पाचवा आणि अंतिम सामना हा अटीतटीचा आणि निर्णायक असा होणार आहे. तसेच हा सामना नसून मालिका असणार आहे. सामन्याच्या निकालासह मालिकेचा विजेता ठरणार आहे. त्यामुळे सामन्यासह मालिका जिंकण्याची किमया कोण करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पाचवा सामना कधी?

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा टी 20I सामान हा बुधवारी 25 मार्च रोजी होणार आहे. सामन्याचं आयोजन हे क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हल इथे करण्यात आलं आहे. टॉम लॅथम न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे. तर केशव महाराज याच्याकडे दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदाची धुरा आहे.

मालिकेत आतापर्यंत काय झालं?

पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंड दौऱ्याची अप्रतिम सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकने मालिकेत विजयी सलामी देत 1-0 ने आघाडी मिळवली. त्यामुळे यजमान न्यूझीलंडवर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवण्याचा दबाव होता. न्यूझीलंडनेही चाहत्यांच्या अपेक्षेप्रमाणे जोरदार कमबॅक केलं. मिचेल सँटनर याने न्यूझीलंडला त्याच्या नेतृत्वात सलग 2 सामन्यांत विजयी केलं. न्यूझीलंडने अशाप्रकारे 3 सामन्यानंतर मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली.

दक्षिण आफ्रिका न्यूझीलंडला विजयी हॅट्रिकपासून रोखण्यात यशस्वी

सलग 2 विजयानंतर न्यूझीलंडचा विश्वास दुणावला होता. तसेच न्यूझीलंडला चौथ्या सामन्यात विजय मिळवून मालिका आपल्या नावावर करण्याची सुवर्णसंधी होती. तर दक्षिण आफ्रिकेसमोर मालिकेत कायम राहण्यासाठी कोणत्याही स्थितीत चौथा सामना जिंकणं बंधनकारक होतं. त्यामुळे चौथ्या सामन्याच्या निकालाकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. दक्षिण आफ्रिकेने हा सामना आपल्या नावावर केला आणि मालिकेत 2-2 ने बरोबरी केली. त्यामुळे आता पाचवा आणि अंतिम सामना कोणता संघ जिंकतो आणि मालिका नावावर करण्यात यशस्वी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us