AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs SL : न्यूझीलंडची श्रीलंकेवर 113 धावांनी मात, मालिकाही जिंकली, 2-0 ने आघाडी

New Zealand vs Sri Lanka 2nd ODI Result And Highlights : न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने यासह मालिकाही जिंकली आहे. न्यूझीलंडने 2-0 अशा फरकाने आघाडी घेतली आहे.

NZ vs SL : न्यूझीलंडची श्रीलंकेवर 113 धावांनी मात, मालिकाही जिंकली, 2-0 ने आघाडी
new zealand cricket team 2nd odi against sri lankaImage Credit source: blackcaps x account
| Updated on: Jan 08, 2025 | 4:33 PM
Share

न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध टी 20i मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेतही विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने सीडन पार्क, हॅमिल्टन येथे झालेल्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा 113 धावांनी धुव्वा उडवला आहे. उभयसंघात पावसाच्या व्यत्ययामुळे 37 ओव्हरचा सामना खेळवण्यात आला. न्यूझीलंडने श्रीलंकेला विजयासाठी 256 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेचा डाव हा 30.2 ओव्हरमध्ये 142 धावांवर आटोपला. न्यूझीलंडने या विजयासह मालिकाही जिंकली. न्यूझीलंडने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडी घेतली आहे.

श्रीलंकेची बॅटिंग

श्रीलंकेकडून 256 धावांचा पाठलाग करताना फक्त चौघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. तर इतर फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. श्रीलंकेसाठी कामिंदु मेंडीस याने सर्वाधिक 64 धावांची खेळी केली. कामिंदुने 5 फोर आणि 3 सिक्ससह 64 रन्स केल्या. तर जनिथ लियानगे याने 22, चामिंदु विक्रमसिंघे याने 17 आणि अविष्का फर्नांडोने 10 धावा जोडल्या. न्यूझीलंडसाठी विलियम ओरुर्के याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. जेकब डफी याने दोघांना बाद केलं. तर मॅट हॅन्री, नॅथन स्मिथ आणि कॅप्टन मिचेल सँटनर या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

त्याआधी श्रीलंकेने टॉस जिंकून न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. न्यूझीलंडने रचीन रवींद्र आणि मार्क चॅपमॅन या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर 250 पार मजल मारली. रचीन रवींद्र याने 79 तर मार्क चॅपमॅन याने 62 धावा केल्या. डॅरेल मिचेलने 38, ग्लेन फिलिप्स 22, मिचेल सँटनर 20 आणि विल यंग याने 16 धावा जोडल्या. न्यूझीलंडने यासह 37 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावू 255 धावा केल्या. महीश थीक्षना याने हॅटट्रिकसह 4 एकूण 4 विकेट्स घेतल्या. वानिंदु हसरंगा याने दोघांना बाद केलं. तर इशान मलिंगा आणि असिथा फर्नांडो या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

न्यूझीलंडचा 113 धावांनी विजय

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, ​​रचिन रवींद्र, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, जेकब डफी आणि विल्यम ओरर्के.

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : चरित असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, चामिंडू विक्रमसिंघे, वानिंदू हसरंगा, महीश थीक्षाना, एशान मलिंगा आणि अशिथा फर्नांडो.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा