NZW vs SAW : न्यूझीलंडचा जबरदस्त विजय, दक्षिण आफ्रिकेचा 80 धावांनी धुव्वा

New Zealand Women vs South Africa Women 1st T20I Match Result : दक्षिण आफ्रिकेला महिला क्रिकेट टीम न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात विजयाने करण्यात अपयशी ठरली आहे. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या सामन्यात 80 धावांनी धुव्वा उडवला.

NZW vs SAW : न्यूझीलंडचा जबरदस्त विजय, दक्षिण आफ्रिकेचा 80 धावांनी धुव्वा
New Zealand Women Cricket Team
Image Credit source: Icc X Account
| Updated on: Mar 16, 2026 | 4:23 AM

न्यूझीलंड वूमन्स क्रिकेट टीमने मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i मालिकेची जबरदस्त अशी सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने अमेलिया केर हीच्या नेतृत्वात रविवारी 15 मार्च रोजी 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेत विजयी सलामी दिली आहे. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 80 धावांच्या मोठ्या फरकाने धुव्वा उडवला. न्यूझीलंडने या विजयासह 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी मिळवली. उभयसंघातील या सामन्याचं आयोजन हे बे ओव्हलमध्ये करण्यात आलं होतं.

सामन्यात काय झालं?

मालिकेतील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. न्यूझीलंडने 7 विकेट्स गमावून 20 ओव्हर अर्थात 120 बॉलमध्ये 190 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी अमेलिया केर हीने सर्वाधिक धावा केल्या. केरने 44 बॉलमध्ये 78 रन्स केल्या. अमेलियाने या खेळीतील 56 धावा या चौकार आणि षटकारांच्या मदतीने पूर्ण केल्या. अमेलियाने 11 चौकार आणि 2 षटकार खेचले. तर जॉर्जिया प्लिमर हीने 63 धावांचं योगदान दिलं.

दुसऱ्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी

अमेलिया आणि जॉर्जिया या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी फक्त 83 बॉलमध्ये 146 रन्सची पार्टनरशीप केली. जॉर्जियाने 44 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 5 फोरच्या मदतीने 63 धावांची निर्णायक खेळी केली. या दोघींव्यतिरिक्त इतर फलंदाजांना काही खास करता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेसाठी मासाबात क्लास आणि नाडीन डी क्लार्क या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट मिळवली. तर इतर दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग, पाहुण्या संघाचे फलंदाज न्यूझीलंडसमोर ढेर

न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर 191 धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेका 7 विकेट्स गमावून 110 धावाच करता आल्या. न्यूझीलंडने अशाप्रकारे हा सामना 80 धावांनी जिंकला. दक्षिण आफ्रिकेसाठी तांजिम बिट्स हीने सर्वाधिक 29 धावा केल्या. तर इतरांना काही खास करता आलं नाही. न्यूझीलंडसाठी सोफी डीव्हाईन हीने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. तर जेस केर हीने दक्षिण आफ्रिकेच्या दोघींना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

अमेलिया केर प्लेअर ऑफ द मॅच

न्यूझीलंडची कॅप्टन अमेलिया केर हीने केलेल्या 78 धावांच्या खेळीसाठी तिला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. दरम्यान  आता उभयसंघातील दुसरा टी 20i क्रिकेट सामना हा 17 मार्च रोजी होणार आहे. न्यूझीलंडचा हा सामना जिंकून मालिकेतील आघाडी मजबूत करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेसमोर मालिकेत विजयाचं खातं उघडण्यासह बरोबरी करण्याचं आव्हान असणार आहे.

Follow Us