AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 : मुंबईच्या ‘या’ शाळेत आली वर्ल्ड कपची ट्रॉफी

World Cup 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून वर्ल्ड कप ट्रॉफीचा प्रमोशन ट्रॉफी टूर सुरु आहे. जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये ही ट्रॉफी फिरवली जात आहे. आता ही ट्रॉफी मुंबईत आहे.

World Cup 2023 : मुंबईच्या 'या' शाळेत आली वर्ल्ड कपची ट्रॉफी
| Updated on: Jul 04, 2023 | 1:22 PM
Share

मुंबई : यंदाचा वनडे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होईल. त्याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून वर्ल्ड कप ट्रॉफीचा प्रमोशन ट्रॉफी टूर सुरु आहे. जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये ही ट्रॉफी फिरवली जात आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान भारतातील 10 शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने आयोजित करण्यात येणार आहेत. मागच्या महिन्यात मुंबईत एका शानदार कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून वर्ल्ड कप शेड्युलची घोषणा करण्यात आली.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वर्ल्ड कपचा पहिला आणि फायनलचा सामना होणार आहे. बंगळुरु, चेन्नई, दिल्ली, धर्मशाळा, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, पुणे आणि मुंबई या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने आयोजित करण्यात येणार आहेत.

वर्ल्ड कपचा पहिला सामना कुठल्या दोन टीममध्ये?

2019 मधील वर्ल्ड कप विजेते इंग्लंड आणि न्यूझीलंड सामन्याने वर्ल्ड कप 2023 ची सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना पाचवेळच्या वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. 8 ऑक्टोबरला चेन्नईत ही मॅच होईल. पारंपारिक कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये 4 नोव्हेंबरला तसच टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्ध सामना 15 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये होईल.

वर्ल्ड कप ट्रॉफीचा प्रमोशनल टूर

सध्या वनडे वर्ल्ड कप ट्रॉफीचा प्रमोशनल टूर सुरु आहे. ही ट्रॉफी सध्या मुंबईत आली आहे. आज मंगळवारी मुंबईतील प्रसिद्ध बॉम्बे स्कॉटिश शाळेत ही ट्रॉफी ठेवण्यात आली आहे. मुंबईत 20 शालेय क्रिकेट टीम ही ट्रॉफी पाहण्यासाठी येतील. मुंबईतल्या कुठल्या शाळेत येणार वर्ल्ड कप ट्रॉफी?

“आमच्या शाळेत वर्ल्ड कपची ट्रॉफी येणार आहे. ट्रॉफी टूरचा हा भाग आहे. कोलकाता, लेह येथून ही ट्रॉफी मुंबईत येईल. आमची मुंबईतील एकमेव शाळा आहे, जिथे ही ट्रॉफी येणार आहे” असं बॉम्बे स्कॉटिश शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता जॉर्ज यांनी सांगितलं.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा