वय फक्त 25 वर्ष, कामगिरी पहाल तर थक्क व्हाल

क्रिकेटमध्ये सतत सराव करावा लागतो. सराव नाही तर काहीच नाही, असं म्हटलं जातं. दुलिप ट्रॉफीमध्ये एका 25 वर्षीय क्रिकेटरनं आपल्या कामगिरीनं सगळ्यांनाच शॉक केलंय. याविषयी अधिक जाणून घ्या...

वय फक्त 25 वर्ष, कामगिरी पहाल तर थक्क व्हाल
साई किशोरImage Credit source: social
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 4:59 PM

नवी मुंबई : क्रीडा (Sports) प्रकार कोणताही असो त्यात विजय (Win)-पराजय हा होतच असतो. कोणी कितीही अनुभवी खेळाडू (Player) असूद्या, त्यानं सराव नाही केला तर तो अपयशी ठरणार. याच प्रकारे जर एखादा नवा खेळाडू असेल आणि त्यानं सरावात सातत्य ठेवलं असेल तर तो विजयश्री खेचून आणू शकतो. असंच काहीसं दुलिफ ट्रॉफीमध्ये घडलं. एका 25 वर्षी क्रिकेटरनं त्याच्या बहारदार कामगिरीनं सगळ्यांचं  लक्ष वेधलंय. क्रिकेटविश्वात देखील या खेळाडूची चांगलीच चर्चा रंगली आहे. हा खेळाडू आहे तरी कोण, याविषयी जाणून घेऊया…

दक्षिण विभागाचा विजय

दुलीप करंडक स्पर्धेत दक्षिण विभागानं उत्तर विभागावर मोठा विजय नोंदवला आहे. उत्तर विभागाला 740 धावांचे लक्ष्य होते. इतके मोठे टार्गेट पूर्ण करणं अशक्य होतं. यामुळे उत्तर विभागाचा संघही काही करू शकला नाही आणि दुसऱ्या डावात किंवा चौथ्या डावात या लक्ष्यासमोर त्याचा डोंगरासारखा पराजीत झाला. परिणामी दक्षिण विभाग 645 धावांच्या मोठ्या फरकानं जिंला.

साई किशोरनं 10 विकेट घेतल्या

दक्षिण विभागाचा हिरो ठरला तो २५ वर्षीय गोलंदाज आहे तरी कोण अशी चर्चा सध्या रंगली आहे. या गोलंदाजानं सामन्यात दहा बळी घेतले आहे. पहिल्या डावात 7 विकेट घेणाऱ्या साई किशोरनं दुसऱ्या डावात 3 विकेट्स घेतल्या आणि चांगलाच चर्चेत आला.

पहिला डाव

दक्षिण विभागानं प्रथम फलंदाजी करताना पहिला डाव 8 गडी बाद 630 धावा करून घोषित केला. यात सलामीवीर रोहन कुनुमलच्या 143 धावा, हनुमा विहारीच्या 134 धावा आणि यष्टीरक्षक रिकी भुईच्या 103 धावांचा समावेश आहे. यानंतर उत्तर विभागाचा संघ खेळायला आला पण साई किशोरच्या चेंडूंनी फलंदाजांना ते प्रश्न पडले ज्याचे उत्तर देणे कठीण झाले. परिणामी उत्तर विभागाचा पहिला डाव अवघ्या 207 धावांत आटोपला. पहिल्या डावात दक्षिण विभागाकडून साई किशोरने 25 षटकात 70 धावा देत 7 बळी घेतले.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.