PAK vs AFG | पाकिस्तानी बॅट्समनला हुशारी नडली, पाक विरुद्ध अफगाण सामन्यात मोठा ड्रामा, VIDEO

PAK vs AFG | पाकिस्तानने 272 धावांवर 8 विकेट गमावले होते. पाकिस्तानला विजयासाठी 14 चेंडूत 29 धावांची गरज होती. फजलहक फारुकीच्या हातात चेंडू होता. त्याने पहिला चेंडू टाकण्याआधीच ड्रामा झाला.

PAK vs AFG | पाकिस्तानी बॅट्समनला हुशारी नडली, पाक विरुद्ध अफगाण सामन्यात मोठा ड्रामा, VIDEO
pak vs afg
Image Credit source: fancode
| Updated on: Aug 25, 2023 | 8:48 AM

नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील स्पर्धा सतत नवीन उंची गाठत आहे. अनेकदा स्टेडियमध्ये दोन्ही देशांचे फॅन्स आपसात भिडले आहेत. बहुतांशवेळा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील क्रिकेट सामने रोमांचक झाले आहेत. मागच्यावर्षी आशिया कप स्पर्धेत शेवटच्या ओव्हरमध्ये जोरदार ड्रामा पाहायला मिळाला होता. यावेळी आशिया कपच्या आधी हे घडलय. नसीम शाहने पुन्हा एकदा पाकिस्तानला संस्मरणीय विजय मिळवून दिला.

आशिया कप 2023 आधी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या टीम श्रीलंकेत वनडे सीरीज खेळत आहेत. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने आरामात विजय मिळवला. पण दुसऱ्या सामन्यात त्यांना संघर्ष करावा लागला. अफगाणिस्तानकडून विजयासाठी 301 धावांच लक्ष्य मिळालं होतं. प्रत्युत्तरात पाकिस्तानने 272 धावांवर 8 विकेट गमावले होते. पाकिस्तानला विजयासाठी 14 चेंडूत 29 धावांची गरज होती.

पहिला चेंडू टाकण्याआधीच ड्रामा

शादाब खान काही कमालीचे शॉट्स खेळला व त्याने टीमला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं. शेवटच्या ओव्हरमध्ये 11 धावांची गरज होती. शादाब नॉन-स्ट्राइकवर होता. अफगाणिस्तानकडून वेगवान गोलंदाज फजलहक फारुकी बॉलिंग टाकत होता. त्याने पहिला चेंडू टाकण्याआधीच ड्रामा झाला.

शादाब भडकला

स्ट्राइकवर पोहोचण्याच्या प्रयत्नात शादाबने फारुकीने चेंडू टाकण्याआधीच क्रीझ सोडला. अफगाण पेसरने हुशारी दाखवत त्याला रनआऊट केलं. शादाब भडकला व निराश होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.

नसीन शाहने तेच केलं

पाकिस्तानचे 9 विकेट गेले होते. अफगाणिस्तानकडे विजयाची संधी होती. स्ट्राइकवर 10 व्या नंबरचा फलंदाज नसीम शाह होता. नसीम शाहने मागच्यावर्षी आशिया कपमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध लास्ट ओव्हरमध्ये 2 सिक्स मारुन 1 विकेटने विजय मिळवून दिला होता. यावेळी समोर फारुकी होता. पाकिस्तानला अशाच विजयाची गरज होती. नसीन शाहने तेच केलं.