PAK vs BAN : बांगलादेशसमोर 136 धावांचं आव्हान, पाकिस्तान रोखणार? कोण मिळवणार फायनलचं तिकीट?

Pakistan vs Bangladesh Super 4 1st Innings Updates : बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी गुडघे टेकले. बांगलादेशने काही कॅचेस सोडल्या. त्यानंतरही पाकिस्तानला 135 धाावंपर्यंतच मजल मारता आली.

PAK vs BAN : बांगलादेशसमोर 136 धावांचं आव्हान, पाकिस्तान रोखणार? कोण मिळवणार फायनलचं तिकीट?
Taskin Ahmed PAK vs BAN Super 4
Image Credit source: @BCBtigers X Account
| Updated on: Sep 25, 2025 | 10:40 PM

आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीतील पाचव्या सामन्यात बांगलादेशने चिवट बॉलिंग करत पाकिस्तानला मोठी धावसंख्या करण्यापासून यशस्वीरित्या रोखलं आहे. टीम इंडियाने आशिया कप स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यानंतर आता पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामन्यात जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहचणार आहे. त्यामुळे या दोन्ही संघांसाठी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होत असलेला सामना निर्णायक आहे. बांगलादेशने या सामन्यात टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. बांगलागदेशच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला. बांगलादेशने पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 8 झटके देत 135 रन्सवर रोखलं. त्यामुळे आता बांगलादेश 136 धावा करुन फायनलमध्ये धडक देणार की साखळी, सुपर 4 नंतर पुन्हा अंतिम फेरीत भारत-पाकिस्तान सामना होणार? हे आता काही तासात स्पष्ट होणार आहे.

पाकिस्तानची बॅटिंग

बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर टॉप ऑर्डरने गुडघे टेकले. टीम इंडिया विरुद्ध अर्धशतकानंतर विकृती दाखवणारा साहिबझादा फरहान 4 धावांवर आऊट झाला. सॅम अयुब पुन्हा एकदा भोपळा फोडण्यात अपयशी ठरला. फखर झमान याने 13 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. हुसैन तलाट 3 रन्स करुन आऊट झाला.

तसेच पाकिस्तानच्या मिडल ऑर्डरला बांगलादेशसमोर संघर्ष करावा लागला. यात काही फलंदाजांना सुरुवात मिळाली. बांगलादेशने या दरम्यान कॅचही सोडल्या. मात्र त्यानंतरही बांगलादेशच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या एकालाही मोठी खेळी करुन दिली नाही.

कॅप्टन सलमान आघा पुन्हा एकदा ढेर झाला.बांगलादेशने सलमान आघाला 20 पार पोहचू दिलं नाही. सलमानने 23 बॉलमध्ये 19 रन्स केल्या. शाहिन आफ्रिदी याने 13 बॉलमध्ये 2 षटकारांसह निर्णायक 19 धावा जोडल्या. पाकिस्तानसाठी मोहम्मद हारीस याने सर्वाधिक 31 धावांचं योगदान दिलं.

बांगलादेशकडून हारीसला शून्यवर जीवनदान मिळालं. हारीसने त्याचा फायदा घेत 31 धावा जोडल्या. तर मोहम्मद नवाझ 15 चेंडूत 2 षटकार आणि 1 सिक्ससह 25 धावा जोडल्या. तर फहीम अश्रफ आणि हरीस रौफ ही जोडी नाबाद परतली. फहीम अश्रफ याने 9 बॉलमध्ये 14 रन्स केल्या. तर हरीस रौफने 3 धावा जोडल्या.

बांगलादेशसमोर 136 धावांचं आव्हान, जिंकणार का?

बांगलादेशकडून एकूण 5 जणांनी बॉलिंग केली. त्यापैकी 5 जणांनी विकेट मिळवली. तर तास्किन अहमद सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. तास्किनने 4 ओव्हरमध्ये 28 धावांच्या मोबदल्यात सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. रिषाद हौसेन आणि मेहदी हसन या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर मुस्तफिजुरने 1 विकेट मिळवली.