PAK vs ENG: बाबर सेनेने हरणाऱ्या मॅचमध्ये बाजी उलटवली, विजय इंग्लंडच्या हातातोंडाशी होता, पण…. पहा VIDEO

PAK vs ENG: थरारक मॅच, 10 चेंडूत विजयासाठी हव्या होत्या 5 धावा, पण इथेच क्रिकेटच्या या स्टोरीमध्ये टि्वस्ट आला.

PAK vs ENG: बाबर सेनेने हरणाऱ्या मॅचमध्ये बाजी उलटवली, विजय इंग्लंडच्या हातातोंडाशी होता, पण.... पहा VIDEO
pak team
Image Credit source: twitter
| Updated on: Sep 26, 2022 | 12:31 PM

मुंबई: क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं. कराचीमधल्या मॅचमध्ये ते दिसून आलं. हैदराबादमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजयी अध्याय लिहिला. त्याचवेळी हजारो किलोमीटर दूर पाकिस्तानातील भूमीवर क्रिकेटमधील एक रोमांचक सामना खेळला गेला. या मॅचमध्ये आधी पाकिस्तानच्या विजयाची शक्यता जास्त होती. पण लास्ट 2 ओव्हर्समध्ये पाकिस्तानच्या विजयाची शक्यता फक्त 2 ते 3 टक्के होती. म्हणजे त्यांचा पराभव जवळपास निश्चिचत मानला जात होता.

इंग्लंडचा विजय यावेळी निश्चित मानला जात होता. पण त्याचवेळी बाबर आजमनच्या सेनेने बाजी पलटली. क्रिकेटमध्ये असं फार कमी वेळा पहायला मिळतं. सोप्या भाषेत सांगायच झाल्यास, पाकिस्तानी टीमने हरलेली बाजी जिंकली.

इंग्लंडसाठी काही कठीण नव्हतं, पण….

शेवटच्या 10 चेंडूत 5 धावा बनवणं अजिबात कठीण नव्हतं. खासकरुन 3 विकेट हातात होते. घाई करण्याची काही आवश्यकता नव्हती. हे सगळं माहित असतानाही, इंग्लंडच्या टीमने जिंकणारा सामना गमावला. शान मसूदने शेवटला घेतलेला रनआऊट महत्त्वपूर्ण ठरला.

इंग्लंडच्या हातात किती विकेट होत्या?

पाकिस्तान-इंग्लंड मॅच 19 व्या आणि 20 व्या ओव्हरमध्ये रोमांचक वळणावर होती. इंग्लंडला 12 बॉलमध्ये विजयासाठी 9 धावांची गरज होती. हॅरिस रौफ 19 वी ओव्हर टाकत होता. पहिला चेंडू डॉट टाकल्यानंतर दुसऱ्या बॉलवर त्याने चौकार खाल्ला. म्हणजे पुढच्या 10 चेंडूत इंग्लंडला विजयासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता होती. हातात 3 विकेट होत्या.

इथेच क्रिकेटच्या या स्टोरीमध्ये टि्वस्ट आला

पण इथेच क्रिकेटच्या या स्टोरीमध्ये टि्वस्ट आला. हॅरिस रौफने तिसऱ्या चेंडूवर लियाम डाउसन आणि चौथ्या बॉलवर स्टोनला आऊट केलं. आता इंग्लंडला विजयासाठी 8 चेंडूत 5 धावांची गरज होती. हातात 1 विकेट होता. रौफच्या 5 व्या बॉलवर लेग बायवर टॉपलेने सिंगल धाव घेतली. ओव्हरमधील शेवटचा चेंडू निर्धाव होता.

सिंगल घेतला त्यानंतर काय घडलं?

शेवटच्या ओव्हरमध्ये इंग्लंडसमोर विजयासाठी 4 धावांचे टार्गेट होते. मोहम्मद वसीमने पहिला चेंडू डॉट टाकला. दुसऱ्या बॉलवर टॉपलेने सिंगल घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी शान मसूदच्या एक जबरदस्त थ्रो वर तो रनआऊट झाला. अशा प्रकारे इंग्लंडने जिंकणारा सामना हरला.

इंग्लंडला किती धावांच टार्गेट होतं?

पाकिस्तानने 3 रन्सनी रोमांचक विजय मिळवला. त्यांनी इंग्लंडसमोर विजयासाठी 167 धावांचे लक्ष्य ठेवले होते. इंग्लंडच्या टीमने 19.2 षटकात फक्त 163 धावा केल्या. 7 टी 20 सामन्याच्या सीरीजमध्ये दोन्ही टीम्स आता 2-2 अशा बरोबरीत आहेत.