PAK vs IND | Agha Salman ला हेल्मेट न घालणं महागात, व्हीडिओ व्हायरल

Aagha Salman Injured | पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया या हायव्होल्टेज सामन्यात मोठी दुर्घटना घडली. पाकिस्तानच्या बॅट्समनला हेल्मेट न घातल्याने चांगलाच 'फटका' बसला. नक्की काय झालंय व्हीडिओत पाहा.

PAK vs IND | Agha Salman ला हेल्मेट न घालणं महागात, व्हीडिओ व्हायरल
| Updated on: Sep 11, 2023 | 11:48 PM

कोलंबो | पाकिस्तान टीम इंडिया आशिया कप 2023 सुपर 4 मधील सामन्यात मोठी दुर्घटना घडली आहे. पाकिस्तानच्या बॅट्समनला नाकावर बॉल लागल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. त्यामुळे काही वेळ खेळ थांबला. सुदैवाने ही दुखापत गंभीर ठरली नाही. मात्र हेल्मेट न घातल्याने काय होऊ शकतं, हे पुन्हा स्पष्ट झालंय. हेल्मेट घालणं सुरक्षेच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे, हेल्मेट चेहऱ्याचं आणि डोक्याचं कशापक्रारे संरक्षण करतं हे असंख्य क्रिकेट चाहत्यांना समजलंय. सामन्यात नक्की असं काय झालं, कोणत्या खेळाडूला ही दुखापत झाली, हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

वाहतूक विभागाकडून प्रवासादरम्यान हेल्मेट वापरण्याचं आवाहन केलं जातं. प्रवासादरम्यान आणि खेळादरम्यानही हेल्मेटचं फार महत्त्व आहे. मात्र पाकिस्तानच्या एका बॅट्समनला हेल्मेट न घालणं महागात पडलं. पाकिस्तानचा बॅट्समन आघा सलमान याने हेल्मेट न घातल्याने तो रक्तबंबाळ झाला. बॉल लागल्यानंतर रक्त आल्याने क्रिकेट चाहते हळहळले. टीम इंडियाच्या खेळाडूंनीही आघाची चौकशी केली. या सर्व घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

जडेजा सामन्यातील 21 वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर आघाने स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला.  मात्र बॅटच्या वरच्या कडेला बॉल लागला. बॉल जाऊन आघाच्या डोळ्याच्या खालील भागाला लागला. त्यामुळे आघा रक्तबंबाळ झाला. त्यामुळे काही वेळ सामना थांबला.

आघा सलमान याला दुखापत


दुखापतीमुळे रक्त येऊ लागलं. पाकिस्तानची मेडीकल टीम धावत मैदानात आली. घाच्या चेहऱ्यावर बँडेज लावली. सुदैवाने दुखापत मोठी नव्हती. मेडीकल टीमने प्रथमोपचार केल्यानंतर रक्त येणं थांबलं. त्यानंतर सामन्याला सुरुवात झाली. आघाला ठेच लागल्यानंतर त्याने हेल्मेट घालून बॅटिंग करण्याचं ठरवलं. मात्र आघा याला कुलदीप यादव याने आघाला 23 धावांवर एलबीडब्लयू आऊट केलं.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रउफ.