Video : पाकिस्तानच्या फखर जमाने झेल पकडला तर नाही, उलट पंचांशी भिडला; झालं असं…

ट्राय सीरिजच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान आणि श्रीलंका आमनेसामने आले आहे. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 114 धावांचं आव्हान दिलं आहे. असं असताना 19व्या षटकात राडा पाहायला मिळाला.

Video : पाकिस्तानच्या फखर जमाने झेल पकडला तर नाही, उलट पंचांशी भिडला; झालं असं...
Video : पाकिस्तानच्या फखर जमाने झेल पकडला तर नाही, उलट पंचांशी भिडला; झालं असं...
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 29, 2025 | 9:48 PM

ट्राय सीरिज 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघ भिडले. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय काही अंशी योग्यच ठरला असंच म्हणावं लागेल. कारण पाकिस्तानने श्रीलंकेला 19.1 षटकात 114 धावांवर गुंडाळलं.   या सामन्यात शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद नवाज यांनी चांगली गोलंदाजी केली. पण असं असताना फखर जमान पंचांशी वाद घालताना दिसला. या क्रिकेट सामन्यातील 19 व्या सामन्यात एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. पाकिस्तानकडून 19वं षटक टाकण्यासाठी शाहिन आफ्रिदी आला होता. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याने उत्तुंग फटका मारला. पण चेंडू बॅटच्या किनाऱ्याला लागून वर चढला. हा चेंडू फखर जमानच्या भागात होता. त्याने धावत जाऊन झेल पकडला आणि जल्लोषही केला. पण त्यानंतर यात एक ट्विस्ट आला आणि जल्लोषाचं रुपांतर रागात झालं.

फखर जमान झेल पकडण्यासाठी धाव घेतली आणि चेंडूवर झेप घेत हातात पकडला. पण झेल घेताना फखर जमान पडला. त्यामुळे पंचांना काही तरी संशय आला. हा चेंडू जमिनीवर घासल्याचं त्यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. तिसऱ्या पंचांनी कॅमेऱ्यातील रेकॉर्डिंग पाठी पुढे करून दोनदा तीनदा पाहीलं. त्यानंतर असं लक्षात आलं की चेंडू झेल पकडल्यानंतर जमिनीला घासला आहे. त्यामुळे हा झेल म्हणता येणार नाही. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी शनाका नाबाद असल्याचं घोषित केलं. त्यानंतर फखर जमानचा पार चढला. इतकंच काय तर पंचांना भिडला आणि रागाच्या भरात काही तरी बोलला. इतर खेळाडूंनीही त्याला तशीच साथ दिली.

दरम्यान श्रीलंकेने विजयासाठी दिलेलं आव्हान पाकिस्तानने सहज गाठलं. पाकिस्तानने 4 गडी गमवून 114 धावा पूर्ण केलं. यासह जेतेपदावर नाव कोरलं. दरम्यान पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदीने 3 षटकात 3 विकेट घेतल्या. मोहम्मद नवाजने 4 षटकात 17 धावा देत 3 गडी बाद केले. तर अब्रार अहमदने 2, सैम अयुबने 1 आणि सलमान मिर्झाने 1 गडी बाद केला.