Video : पाकिस्तानकडून पुन्हा एकदा रडीचा डाव, नाणेफेकीवेळी केली भारताची फसवणूक!

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीवेळी भारतीय कर्णधाराने पाकिस्तानी कर्णधाराकडे ढुंकूनही पाहीलं नाही. पण पाकिस्तानने या सामन्यात रडीचा डाव खेळला आहे. झालं असं की....

Video : पाकिस्तानकडून पुन्हा एकदा रडीचा डाव, नाणेफेकीवेळी केली भारताची फसवणूक!
Video : पाकिस्तानकडून पुन्हा एकदा रडीचा डाव, नाणेफेकीवेळी केली भारताची फसवणूक!
Image Credit source: Getty Images
| Updated on: Oct 05, 2025 | 5:07 PM

श्रीलंकेच्या कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सहावा सामना होत आहे. या सामन्यात भारत पाकिस्तान आमनेसामने आले आहेत. भारत पाकिस्तान यांच्यातील वाद गेल्या महिन्यापासून क्रिकेट मैदानात गाजत आहे. आशिया कप स्पर्धेनंतर आता वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतही दोन्ही संघातील वाद पाहायला मिळत आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने या सामन्यात नो हँडशेक पॉलिसी कायम ठेवली. भारताने या सामन्यात देखील पाकिस्तानी क्रिकेट संघाला लायकी दाखवून दिली. त्यामुळे पाकिस्तानी कर्णधार फातिमा सनाला डोकं खाली घालून जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. पण या सामन्यात भारतीय संघाची फसवणूक झाल्याचं समोर आहे. कारण पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने नाणेफेकीचा कौल गमावला होता. मात्र तरीही तिला विजयी घोषित करण्यात आलं. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. भारताची फसवणूक झाल्याचं सांगितलं जात आहे.

भारतीय संघाने आशिया कप स्पर्धेतील नो हँडशेक पॉलिसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेतही कायम ठेवली आहे. हरमनप्रीत कौरने पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हीच्याकडे ढुंकूनही पाहीलं नाही. हस्तांदोलन करण्याची बाब तर फारच दूर आहे. पण या सर्व प्रकारात भारताची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक केली. यावेळी पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हीने कौल मागत टेल सांगितलं. इथपर्यंत सर्व काही ठीक होतं. कौल पडला आणि हेड आला. पण सामनाधिकारी शांद्रे फ्रिट्ड यांनी सनाने हेड्स म्हंटल्याचं सांगितलं. सामनाधिकाऱ्यानी पाकिस्तानच्या नाणेफेकीचा कौल दिला.

पाकिस्तानची कर्णधार निर्लज्जपणे कौल आपल्या बाजूने लागल्याचं सांगत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तिने टेल्स सांगितल्याचं बोललीच नाही. दुसरीकडे, सामनाधिकारी, टॉस प्रेझेंटर मेल जोन्स आणि भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी याकडे दुर्लक्ष केलं. पाकिस्तानी कर्णधाराने टेल कॉल केला होता, पण लबाडी कशी असते हे दिसून आलं. त्यामुळे भारताने टॉस गमावली. रडीचा डाव खेळत कर्णधार फातिमा सना पुढे गेली आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली.