कॉपी करायची नाही..! सलमान आघाने अंतिम सामन्यात सूर्यकुमारची स्टाईल मारायला गेला, झालं असं की…

भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना सुरु आहे. या सामन्यात खेळाडूंमध्ये आक्रमकपणा असेल याची जाणीव प्रत्येकाला होती. झालंही तसंच.. कर्णधार सूर्यकुमारने नो हँडशेक भूमिका कायम ठेवली. तर सलमान तशीच स्टाईल मारायला गेला.

कॉपी करायची नाही..! सलमान आघाने अंतिम सामन्यात सूर्यकुमारची स्टाईल मारायला गेला, झालं असं की...
कॉपी करायची नाही..! सलमान आघाने अंतिम सामन्यात सूर्यकुमारची स्टाईल मारायला गेला, झालं असं की...
Image Credit source: ACC
| Updated on: Sep 28, 2025 | 9:16 PM

आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा भारताच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. समालोचकाची भूमिका माजी क्रिकेटपटू रवि शास्त्री बजावत होते. त्यांनी सूर्यकुमार यादवला कौल आणि इतर प्रश्न विचारले. त्यावर कर्णधार सूर्यकुमार यादवने दिलखुलास उत्तरं दिली. त्यानंतर सलमान आघाची पाळी आली. पण त्याने रवि शास्त्री यांच्याशी वार्तालाप करण्यास नकार दिला. पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा नाणेफेकीवर समालोचक म्हणून माजी कर्णधार वकार युनूसला घेऊन आला होता. त्याने त्यांच्याशी चर्चा केली. खरं तर पाकिस्तानची जितकी नाचक्की व्हायची ती झाली आहे. आता भारताने केलं तसंच काहीसं करण्याचा केविलवाणा प्रकार पाकिस्तानी कर्णधाराने केला.

समालोचकाच्या भूमिकेत असलेल्या वकार युनिसने त्याला विचारलं की तुम्ही नाणेफेक हारला आहात, तुझं काय म्हणणं आहे. त्यावर सलमान आघा म्हणाला की, “मला फलंदाजी करायला नक्कीच आनंद होत आहे. आम्ही या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. आम्ही अद्याप एकही परिपूर्ण सामना खेळलेला नाही. आशा आहे की, आज आम्ही एक परिपूर्ण सामना खेळू.” इतकंच काय तर प्लेइंग 11 मध्ये बदल नाही असं देखील त्याने स्पष्ट केलं.

सूत्रांच्या माहितीनुसार, समालोचक असलेल्या रवि शास्त्री यांना हटवण्याची मागणी पाकिस्तानने केली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशियाई क्रिकेट परिषदेकडे तशी विनंती केली होती. याबाबत तटस्थ समालोचक असावा असं सांगितलं होतं. याबाबत एसीससीने ही विनवणी बीसीसीआयकडे केली. तेव्हा बीसीसीआयने स्पष्ट केलं की, रवि शास्त्री यांच्या जागी दुसरं कोणी नसेल. शेवटी मधला मार्ग काढला गेला. यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा समालोचक वकार युनिशसोबत, भारतीय कर्णधार रवि शास्त्री यांच्याशी बोलेल.