आयसीसी टी 20 वर्ल्ड कपनंतर या खेळाडूला मिळाली कॅप्टन्सी, कोण आहे तो?

Cricket news: आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 नंतर मोठी बातमी समोर आली आहे. विकेटकीपर बॅट्समन खेळाडूला कर्णधार करण्यात आलं आहे.

आयसीसी टी 20 वर्ल्ड कपनंतर या खेळाडूला मिळाली कॅप्टन्सी, कोण आहे तो?
muhammad Rizwan and mohammad Siraj
| Updated on: Jul 01, 2024 | 7:19 PM

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतून बाहेर व्हावं लागल्याने पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन बाबर आझम याच्यावर जोरदार टीका करण्यात आली. बाबरला कर्णधारपदावरुन हटवण्यात यावं, अशी मागणी केली जात आहे. आता बाबरचं भवितव्य हे पीसीबीच्या हातात आहे. “मी कर्णधारपदाचा राजीनामा देऊन, तेव्हा मी तुम्हाला सांगेन”, असं बाबरने काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. पीसीबीने बाबरला कर्णधारपदावरुन हटवलं नाही, मात्र त्याला बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर केलं. त्यानंतर बाबरला आणखी एक झटका लागला आहे. बाबरला कॅनडा जीटी20 लीग स्पर्धेतून झटका लागला आहे. या स्पर्धेत बाबरला वगळून मोहम्मद रिझवान याला कॅप्टन्सीची जबाबदारी देण्यात आली आहे. मोहम्मद रिझवान वेंकवूर नाईट्स टीमचं कर्णधारपद सांभाळणार आहे.

कॅनडात जीटी20 लीग स्पर्धेच्या चौथ्या हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या दरम्यान वेंकवूर नाईट्स टीमच्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवरुन मोहम्मद रिझवान याला कॅप्टन केल्याची माहिती देण्यात आली आहे. टीमने प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, “मोहम्मद रिझवान याला त्याच्या शानदार बॅटिंग आणि विकेटकीपिंग या 2 मुद्द्यांमुळे कर्णधार करण्यात आलं आहे.” त्यामुळे आता बाबरला रिझवानच्या नेतृत्वात खेळावं लागणार आहे. बाबर रिझवान व्यतिरिक्त या स्पर्धेत पाकिस्तान टीममधील मोहम्मद आमिर आणि आसिफ अली हे दोघेही सहभाग घेणआर आहेत. तसेच शाहीन अफ्रिदी हा टोरंटो नेशनल या संघांचं प्रतिनिधित्व करणार आहे.

दोघांपैकी कॅप्टन्सी कोणाची भारी?

बाबर आझम याने पाकिस्तानचं 85 टी20i सामन्यांमध्ये नेतृत्व केलं आहे. बाबरने 85 पैकी 48 सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवून दिला आहे. बाबरच्या नेतृत्वात पाकिस्ताने गेल्या टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. मात्र तिथून बाबर कॅप्टन म्हणून निष्प्रभ ठरला. बाबरला तिथून एक ट्रॉफी जिंकून देता आली नाही. तसेच बाबर पीएसएलमध्ये पेशावर जाल्मीचं नेतृत्व करतो. बाबरच्या नेतृत्वात पेशावर जाल्मीने 22 पैकी 11 सामने गमावले आहेत. तर मोहम्मद रिझवानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचं नेतृत्व अद्याप कधीही केलेलं नाही. मात्र त्याने आपल्या कॅप्टन्सीत मुल्तान सुल्तांस टीमला 3 वेळा अंतिम फेरीत पोहचवलंय.