
न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फायनलमध्ये टीम इंडियाला पराभूत करेल, असं अनेक पाकिस्तानच्या आजी माजी खेळाडूंना वाटत होतं. मात्र टीम इंडियाने किवींचा 4 विकेट्सने धुव्वा उडवत पाकिस्तानला तोंडावर पाडलं आणि त्यांना चुकीचं सिद्ध करुन दाखवलं. तसेच टीम इंडियाने साखळी फेरीत यजमान पाकिस्ताचा धुव्वा उडवला. टीम इंडियाने पाकिस्तानवर मिळवलेला हा विजय माजी कर्णधार इंझमाम उल हक याला असह्य झाला. इंझमानने या द्वेषातून टीम इंडियाचे माजी कर्णधार लिटिल मास्टर सुनील गावसकर यांच्यावर आरोप केले. पाकिस्तानचा सामना करावा लागू नये म्हणून गावसकर यांनी शारजाहमधून पळून जाण्याचा निर्णय केला होता, असा आरोप इंझमामने केला. इंझमामचा हा व्हीडिओ टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर वेगात व्हायरल झाला आहे.
भारताने सामना जिंकला, ते चांगले खेळले. मात्र मिस्टर गावसकर यांना आकड्यांवर नजर टाकायला हवी. गावसकर यांनी एकदा पाकिस्तानचा सामना करावा लागू नये, यासाठी शारजाहमधून पळून जाण्याचा निर्णय घेतला होता. ते आमच्यापेक्षा मोठे आहेत, आमचे वरिष्ठ आहेत. आम्ही त्यांचा फार सन्मान करतो. मात्र कोणत्या देशाबाबत अशाप्रकारे बोलणं योग्य नाही. तुम्ही तुमच्या संघांचं वाटेल तितकं कौतुक करा, मात्र दुसऱ्या संघाबाबत अशी प्रतिक्रिया देणं योग्य वाटत नाही”, असं इंझमामने म्हटलं.
“त्यांनी आकडे पाहायला हवेत. त्यानंतर त्यांना समजेल की पाकिस्तान कुठे आहे. त्यांनी अशी प्रतिक्रिया दिल्याने मला फार दु:ख झालं. ते एक महान आणि सन्मानित क्रिकेटपटू राहिले आहेत. त्यांनी त्यांच्या तोंडावर ताबा ठेवायला हवा. हे मी स्पष्ट शब्दात सांगतोय”,असं इंझमामने म्हटंल.
इंझमामला टीका झोंबली
Inzmam ul haq warns Sunil Gavaskar:
“Apni Zuban ko zara sambhal ke istemal karen”
Strong response from Inzmam ul haq for Sunil Gavaskar’s claim that even a India-A side can beat current Pakistan team. pic.twitter.com/uTyiAAzncB
— Varun Giri (@Varungiri0) March 8, 2025
“मला वाटतं की बी टीम इंडियाही पाकिस्तानला निश्चित आव्हान देऊ शकते. सी टीमबाबत मला खात्री नाही. मात्र पाकिस्तान क्रिकेट टीमची सध्याची कामगिरी पाहता त्यांना बी टीमला पराभूत करणं हे अवघड ठरेल”, असं गावसकर म्हणाले होते.