चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच न्यूझीलंडचा संघ अंतिम फेरीत, पाकिस्तान किंवा दक्षिण अफ्रिकेशी होणार सामना

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेपूर्वी पाकिस्तानात वनडे ट्राय सिरीजचा थरार रंगला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने ही ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. या मालिकेत न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आहेत. न्यूझीलंडने चमकदार कामगिरी दोन्ही संघांना धूळ चारली आणि अंतिम फेरी गाठली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच न्यूझीलंडचा संघ अंतिम फेरीत, पाकिस्तान किंवा दक्षिण अफ्रिकेशी होणार सामना
Image Credit source: Twitter
| Updated on: Feb 10, 2025 | 5:56 PM

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर पाकिस्तान आणि दुबईत होणार आहेत. भारताचे सर्व सामना दुबईत होणार आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी आठही संघ कसून सराव करत आहेत. भारत इंग्लंड मालिका एकीकडे सुरू आहे. तर न्यूझीलंड-दक्षिण अफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात लढत सुरु आहे. ट्राय सिरीज पाकिस्तानात होत असल्याने तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणं सोपं होणार आहे. न्यूझीलंडने या वातावरणाशी जुळवून घेतलं आहे असंच म्हणावं लागेल. साखळी फेरीतील दोन्ही सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिकेला लोळवलं आहे. त्यामुळे अंतिम फेरी गाठणारा पहिला संघ ठरला. पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 78 धावांनी पराभव केला. तर दुसऱ्या दक्षिण अफ्रिकेल 6 गडी राखून पराभूत केलं. त्यामुळे आता अंतिम फेरीच्या दुसऱ्या संघासाठी पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिकेत चुरस आहे. दोन्ही संघांनी आपला पहिला सामना गमवल्याने करो या मरोची लढाई आहे. हा सामना 12 फेब्रुवारीला होणार आहे. तर अंतिम फेरीचा सामना 14 फेब्रुवारीला होणार आहे.

दक्षिण अफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड सामना

न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 गडी गमवून 304 धावा केल्या आणि विजयासाठी 305 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान न्यूझीलंडने 4 गडी गमवून 49 व्या षटकात पूर्ण केलं. या सामन्यात डेवॉन कॉनवे आणि केन विल्यमसनन चांगली खेळी केली. दुसऱ्या विकेटसाठी या दोघांनी 187 धावांची भागीदारी केली. तर डेवॉन कॉनवेचं शतक फक्त 3 धावांनी हुकलं. दुसरीकडे, केन विल्यमसनने नाबाद शतकी खेळी करत संघला विजय मिळवून दिला.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): टेम्बा बावुमा (कर्णधार), मॅथ्यू ब्रेट्झके, जेसन स्मिथ, वायन मुल्डर, काइल वेरेन (विकेटकीपर), मिहलाली मपोंगवाना, सेनुरान मुथुसामी, इथन बॉश, ज्युनियर डाला, लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी.

न्यूझीलंड (खेळणारा संघ): विल यंग, ​​डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, बेन सियर्स, विल्यम ओरोर्क