पाकिस्तानचा आणखी एक खेळाडू रिटायर्ड आऊट, आता 55 चेंडूत केलं असं की…

पाकिस्तानचे खेळाडू आता वेगवेगळ्या लीग स्पर्धेत, देशासाठी खेळताना लाज घालवत आहेत. त्याची अनेक उदाहरणं समोर येत आहेत. आता अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी आणखी एक रिटायर्ड आऊटचं प्रकरण समोर आलं आहे. चला जाणून घेऊयात नेमकं काय झालं ते...

पाकिस्तानचा आणखी एक खेळाडू रिटायर्ड आऊट, आता 55 चेंडूत केलं असं की...
पाकिस्तानचा आणखी एक खेळाडू रिटायर्ड आऊट, आता 55 चेंडूत केलं असं की...
Image Credit source: PTI
Rakesh Thakur | Updated on: Jan 14, 2026 | 6:21 PM

Sameer Minhas Retire Out: अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेसाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. यासाठी सर्वच संघांची जोरदार तयारी सुरू आहे. या स्पर्धेपूर्वी अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेचे वॉर्मअप सामने पार पडले. या स्पर्धेपूर्वी पार पडलेल्या वॉर्मअप सामन्यात समीर मिन्हास मैदानात उतरला होता. पण त्याच्यावर रिटायर्ड आऊट होण्याची नामुष्की ओढावली. खरं तर समीर मिन्हास फॉर्मात आहे. असं असूनही त्याला रिटायर्ड आऊट केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या स्पर्धेपूर्वी त्याने धावांचा डोंगर रचला आहे आणि त्यासाठीच त्याची संघात निवड केली आहे. मग असं सर्व असूनही त्याला रिटायर्ड आऊट करण्याची वेळ का आली? खरं तर मैदानात उपस्थित असलेला खेळाडू गरजेपेक्षा संथ गतीने खेळत असेल तर त्याला रिटायर्ड आऊट केलं जातं. मग पाकिस्तानचा अंडर 19 संघातील स्टार खेळाडू समीर मिन्हास संथ गतीने खेळत होता?

अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीच्या वॉर्मअप सामना पाकिस्तान आणि अमेरिकेत पार पडला. हा पाकिस्तानचा दुसरा वॉर्मअप सामना होत. तर समीर मिन्हासचा पहिला वॉर्मअप सामना होता. कारण यापूर्वी बांगलादेशविरुद्धच्या वॉर्मअप सामन्यात खेळला नव्हता. 13 जानेवारीला पार पडलेल्या या सामन्यात पाकिस्तानच्या वाटेला फलंदाजी आली. समीर मिन्हास हा मोहम्मद शायनसह ओपनिंगला उतरला होता. त्या दोघांनी चांगली सुरुवात केली. या दोघांनी मिळून 105 धावांची भागीदारी केली. पण ही जोडी बाद झाल्याने नाही तर पाकिस्तानी संघाच्या व्यवस्थापनाच्या निर्णयामुळे तुटली. समीर मिन्हासने 55 चेंडूत 74 धावा केल्या होत्या. यात 8 चौकार आणि 4 षटकार मारले होते. समीर मिन्हास शतक ठोकणार असंच वाटत होतं. पण संघ व्यवस्थापनाने त्याला रिटायर्ड आऊट केलं.

मोहम्मद रिझवाननं तर या वर्षात समीर मिन्हास रिटायर्ड आऊट होणारा पाकिस्तानचा दुसरा खेळाडू आहे. बिग बॅश लीग स्पर्धेत मोहम्मद रिझवानला संथ गतीने फलंदाजी केल्याने रिटायर आऊट केलं गेलं. तर समीर मिन्हासला आराम देण्यासाठी आणि दुखापत होऊ नये यासाठी रिटायर्ड आऊट दिलं गेलं. दरम्यान, या सामन्यात पाकिस्तानने 50 षटकात 8 गडी गमवून 294 धावा केल्या. तसेच अमेरिकेचा संघ 43.5 षटकात सर्व गडी गमवून 225 धावा करू शकला.