वनडे कर्णधारपदावरून बाबर आणि शाहीन यांच्यात काय घडतंय? आफ्रिदी स्पष्टच म्हणाला की…

पाकिस्तान क्रिकेट आणि वाद हे काही नवीन नाही. पाकिस्तान क्रिकेटमध्ये रोज नवा वाद समोर येत असतो. असं असताना बाबर आझमकडे पुन्हा एकदा कसोटी संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. आता वनडे क्रिकेटबाबत नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

वनडे कर्णधारपदावरून बाबर आणि शाहीन यांच्यात काय घडतंय? आफ्रिदी स्पष्टच म्हणाला की...
वनडे कर्णधारपदावरून बाबर आणि शाहीन यांच्यात जुंपली! आफ्रिदी स्पष्टच म्हणाला की...
Image Credit source: TV9 Network/Telugu
| Updated on: Aug 12, 2026 | 12:25 PM

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट संघात कधी काय होईल सांगता येत नाही. आता पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेट बोर्डात एक नव्या चर्चेला म्हणण्यापेक्षा नव्या वादाला सुरूवात झाली आहे. कसोटी संघाच्या कर्णधारपदी बाबर आझम यांची नियुक्ती झाली आहे. आता त्याच्या खांद्यावर वनडे संघाची धुरा देण्याची तयारीही सुरू झाली आहे. या चर्चा सुरू असताना वनडे संघाचा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीने मात्र आपला पवित्रा स्पष्ट केला आहे. वनडे संघाचं कर्णधारपद त्याच्याकडेच असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात वनडे संघाची धुरा बाबरकडे सोपण्याची चर्चा सुरू झाली तर जोरदार राडा होण्याची शक्यता आहे. वनडे संघाच्या कर्णधारपदाबाबत शाहीन शाह आफ्रिदीला एक प्रश्न विचारला गेला. त्यावर त्याने आपल्या भाषेत उत्तर दिलं.

काय म्हणाला शाहीन शाह आफ्रिदी?

प्रशिक्षक माइक हेसन आणि मुख्य निवडकर्ते आकिब जावेद यांचा पाठिंबा तुम्हाला आहे का? या प्रश्नावर शाहीन शाह आफ्रिदीने हसतच उत्तर दिलं. शाहीन म्हणाला की, ‘मी आतापर्यंत तरी पाकिस्तानचा कर्णधार आहे.’ त्याच्या एका वाक्यात बरेच अर्थ दडले आहे. सध्या तरी कर्णधार बदलाचे वारे आणि चर्चा त्याच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही. दुसरीकडे, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बाबर आझमला तिन्ही फॉर्मेटची सूत्र हाती सोपण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं बोललं जात आहे. रिपोर्टनुसार, बाबर आझमने तशीच अटच ठेवली होती. कसोटी संघाचं कर्णधार पद दिलं तर इतर फॉर्मेटची जबाबदारीही द्या असं त्याने सांगितल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये येत्या काही दिवसात बरंच काही घडेल असं चित्र आहे.

शाहीन शाह आफ्रिदीला ऑक्टोबर 2025 मध्ये वनडे संघाची धुरास सोपवली होती. मोहम्मद रिझवानच्या जागी त्याची निवड झाली होती. कारण रिझवानच्या नेतृत्वात पाकिस्तान संघ चॅम्पियन्स ट्रॉफीत काही विशेष करू शकला नव्हता. तसेच वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिकाही गमावली होती. त्यामुळे शाहीन शाह आफ्रिदीवर जबाबदारी टाकली होती. पण त्याच्या नेतृत्वावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चेहरामोहरा बदलण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पीसीबीने वनडे संघाच्या कर्णधाराबाबत एखादा निर्णय घेतला तर आश्चर्य वाटायला नको.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us